Donald Trump (Photo Credits: Getty)

चीन (China) मधील वुहान (Wuhan) शहरातून लागण झालेल्या कोरोन व्हायरसचे (Coronavirus) जाळे आता जगभरातील विविध देशात जाऊन पोहचत आहे. त्यामुळे विविध भागातून नागरिकांच्या मृताचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर काही दिवसांपूर्वी डब्लूएचओ (WHO) यांना जागतिक वैद्यकिय आणीबाणी सुद्धा लागू केली होती. कोरोना व्हायरस भारतात सुद्धा पोहचला असून केरळात त्याचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभुमीवर भारत सरकार कडून चीन येथून येणाऱ्या प्रवाशांवर तत्काळ स्वरुपात बंदी घालण्यात आली आहे. चीन मध्ये कोरोना व्हायरसमुळे संक्रमित होऊन मृतांचा आकडा 492 वर पोहचला आहे. तर 24 हजार नागरिक कोरोना मुळे संक्रमित झाले आहेत.

चीन मधील कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी चीनच्या सरकार सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भयंकर अशा कोरोना व्हायरचा नाश करण्यासाठी ठोस पावले उचचली जाणार असल्याचे ही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहेत. तर अमेरिकेच्या सरकारकडून चीन नागरिकांना कोरोना पासून वाचवण्यसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.(Coronavirus: कोरोना व्हायरस राज्यावरील आपत्ती! केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांची घोषणा)

ANI Tweet:

जपानच्या एका मीडिया रिपोर्टनुसार, हॉंगकॉंग येथून योकोहामा येथे आलेल्या क्रुज मधील जवळजवळ 10 हजार लोकांना कोरोना व्हायरसचे संक्रामण झाल्याचे दिसून आले आहे. जपानचे आरोग्य मंत्री यांनी बुधावारी क्योदो न्यूज यांच्या हवाल्याने याबाबत अधिक माहिती दिली आहे. तसेच कोरोना व्हायरस संक्रामण झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

केरळात कोरोना व्हायरस तीन प्रकरणांची पुष्टी झाल्यानंतर अद्याप कोणताही नवे प्रकरण समोर आलेले नाही. राज्यात 2421 नागरिकांवर या प्रकरणी लक्ष ठेवले जात आहे. आरोग्य मंत्री शैलजा यांनी कोरोना बाबत अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, कमीत कमी 100 नागरिकांना विविध रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच बहुसंख्येने नागरिकांना घरीच थांबण्याचे निर्देशन देण्यात आले आहेत.