Coronavirus: जगभरात 1.04 कोटी नागरिक कोरोना व्हायरस संक्रमित; 509000 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू
Coronavirus In Maharashtra (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची वाढती आकडेवारी आता केवळ एक संख्या बनून राहिली आहे. जी दिवसाणीक वाढतच चालली आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची दैनंदिन आकडेवारी जाहीर करत असते. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी संचलित सेंट फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग (CSSE) ने दिलेल्या आकडावेरीनुसार जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या बुधवारी (1 जुलै) सकाळपर्यंत 10,434,835 कोटी इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 509,779 इतकी आहे.

सीएसएसई (CSSE) च्या आकडेवरीनुसार कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत अमेरिका सर्वात प्रथम क्रमांकावर आहे. अमेरिकेत सध्यास्थितीत 2,629,372 इतके कोरोना रुग्ण आहेत. तर, 127,322 नागरिकांचा इथे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेपाठोपाठ कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या संख्येत ब्राजील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझिलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1,402,041 इतकी आहे. तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 59,594 इतकी आहे. (पाठिमागील 48 तासात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या कितीने वाढली घ्या जाणून.)

जगभरातील देशांची कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आकडेवारी

 1. अमेरिका-2,629,372
 2. ब्राजील-1,402,041
 3. रशिया-646,929
 4. भारत -566,840
 5. इंग्लंड- 314,160
 6. पेरू -285,213
 7. चिली -279,393
 8. स्पेन -249,271
 9. इटली -240,578
 10. ईरान -227,662
 11. मॅक्सिको -220,657
 12. पाकिस्तान- 209,337
 13. फ्रान्स -202,063
 14. तुर्की -199,906
 15. जर्मनी -195,418
 16. सऊदी अरब -190,823
 17. दक्षिण अफ्रीका-151,209
 18. बांग्लादेश -145,483
 19. कॅनडा-106,097

जगभात कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 10 हजारांहून अधिक असलेल्यांमध्ये इंग्लंड (43,815), इटली (34,767), फ्रान्स (29,846), स्पेन (28,355), मॅक्सिको (27,121), भारत (16,893) आणि ईरान (10,670) या देशांचा समावेश आहे.