प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : commons.wikimedia)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) साथीमुळे बंद असलेल्या शाळांचा (Schools) परिणाम जगभरातील सुमारे 1 कोटी मुलांवर होऊ शकतो. लॉक डाऊनमुळे जवळपास 1 कोटी मुले कायमची शाळा सोडू शकतात, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. 'सेव्ह द चिल्ड्रन' (Save the Children) नावाच्या ब्रिटीश संस्थेने 'अभूतपूर्व शिक्षण आणीबाणी' (Unprecedented Education Emergency) चा इशारा दिला आहे. कोरोना विषाणूच्या साथीने जवळजवळ संपूर्ण जग थांबले आहे. अद्याप बहुतेक व्यापार बंद आहे, शैक्षणिक संस्थांना सुरक्षा उपायांसह पुन्हा उघडण्यास अडचणी येत आहेत. अशात 'सेव्ह द चिल्ड्रन' नावाच्या संस्थेने 'शैक्षणिक आणीबाणी'ची शक्यता वर्तवली आहे.

यामुळे 97 लाखापेक्षा जास्त मुलांचे शिक्षण धोक्यात येऊ शकते व ते कधीच शाळेत परत येऊ शकणार नाहीत. सध्या 1 कोटी 60 लाख मुलांपर्यंत शिक्षण पोहोचू शकत नाही. ब्रिटीश संस्थेने युनेस्कोच्या (UNESCO) आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे की, एप्रिलमध्ये कोविड-19 मुळे जगभरातील 1.6 कोटी, म्हणजेच या जगाच्या एकूण विद्यार्थी लोकसंख्येच्या जवळजवळ 90 टक्के विद्यार्थी शाळा व विद्यापीठातून बाहेर पडले. 'सेव्ह अवर एज्युकेशन' (Save our Education) नावाच्या नवीन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, मानवी इतिहासात प्रथमच जगभरातील मुलांच्या संपूर्ण पिढीच्या शिक्षणावर एकाच वेळी विपरीत परिणाम झाला आहे.

(हेही वाचा: कोरोनावरील औषध बनवण्यात रशियाने मारली बाजी? सर्व क्लिनिकल चाचणी परीक्षणात लस यशस्वी ठरल्याचा सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा)

यासह, विषाणूनंतरच्या सुधारणांदरम्यान 90 लाख ते 1 कोटी 17 लाख मुलांना गरीबीचा सामना करावा लागेल, ज्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या आणखी कमी होईल. आर्थिक आणि सामाजिक तथ्यांच्या आधारे या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, 97 लाख मुले कायमची शाळा सोडतील. त्यानंतर अधिक मुलांना अनौपचारिक बेरोजगारीमध्ये ढकलले जाईल आणि बर्‍याच परिस्थितींमध्ये मुलींना लग्न करण्यास भाग पाडले जाऊ शकते.