Chinese Woman in Pakistan: प्रेमात सीमा नसतात तसचं काहीस चित्र सद्या भारतासह पाकिस्तान मध्ये पाहायला मिळत आहे. सद्या सोशल मीडियावर अंजू ऊर्फ फातिमा आणि नरसुल्ला यांच्या प्रेमकहाणींची चर्चा होत आहे. दरम्यान हे प्रकरण इतकं ताजं असताना चिनी तरुणीचा असाच काहीसं प्रकार उघडकीस आले आहे. चिनी तरुणीची पाकिस्तानी तरुणासोबतची प्रेमकहाणीही समोर आल आहे.या आधी पाकिस्तानी (Pakistani) सीमा हैदर ही चार मुलांसह भारतात (India) प्रियकरांकडे आली. या दोघांच्या लव्हस्टोरी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सीमेपलीकडील लव्हस्टोरी सध्या ट्रेंडिंग विषय बनला आहे. सीमा हैदर(Seema Haidar) , अंजू (Anju) नंतर चिनी तरुणींने असा पराक्रम केल्यामुळे सर्वांच्या भुवयां उंचावल्या आहेत.
गाओ फेंग असलेली चिनी तरुणी पाकिस्तानी व्यक्तीच्या प्रेमात पडली. प्रेमासाठी थेट पाकिस्तानात पोहोचली. चीनच्या शांक्सी प्रांतातील गाओ फांग नावाची 20 वर्षीय तरुणीही आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या खालच्या दिर जिल्ह्यात पोहोचली आहे. येथे तिचा 18 वर्षांचा प्रियकर जावेद राहतो. जावेद गाओ फँगपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. सीमा हैदर पाठोपाठ अंजू भारतातून पाकिस्तानात पोहचली. इस्लाम धर्म स्वीकारत लग्न ही केल्याची माहिती समोर आली. दरम्यान चिनी तरुणीने देखील प्रियकरांसाठी थेट पाकिस्तान गाठलं.
पाकिस्तानी सुत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, गाओ फांग तीन महिन्यांच्या टुरिस्ट व्हिसावर पाकिस्तानात पोहोचली आहे. जावेद हा खैबर पख्तुनख्वामधील बाजौरचा रहिवाशी आहे. इथेच त्याची चिनी प्रियकर त्याला भेटायला आली होती. दोघेही लवकरच लग्न करू करणार अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पाकिस्तानात पोहोचल्यावर चिनी तरुणी गाओ फांगने इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचं म्हटलं जात आहे. इस्लाम धर्मानुसार, तिने आपलं नाव बदलून किसवा ठेवलं आहे. स्थानिक पोलिसांना ही माहिती मिळताच सर्तक झाले. पोलीस अधिकारी झियाउद्दीन यांनी चिनी महिलेला कडक सुरक्षा दिल्याची माहिती मिळाली आहे.