![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/kiss-380x214.jpg)
Shocking News: भारतात (India) सीमा हैदर (Seema Haidar) आणि सचिन (Sachin) प्रकरण ताजं असताना, भारतातून एक प्रियसी पाकिस्तानात फरार झाली आहे. सीमा प्रियकरांसाठी पाकिस्तानातून भारतात आली, हे घटना ऐकताच सर्वांचे होश उडाले आहे. सोशल मीडियाच्या प्रेमात अडकलेल्या भारतीय महिला चक्क पाकिस्तानात जाऊन पोहोचली. राजस्थानची अंजू प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये पोहोचली आहे. भारतातील सीमा हैदर प्रेमप्रकरण फार चर्चेत रंगलं आहे. भारतातील या प्रकरणांमुळे भारतीय लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
पाकिस्तानी सीमा हैदर भारतात आपल्या चार मुलांसह प्रियकर सचिनकडे पोहोचली. प्रेमापोटी ग्रेट नोएडाला येथे राहते. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू ही बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तान गाठलं. ही घटना समोर येताच सर्वांचे होश उडाले आहे. अंजू पती आणि मुलांना सोडून पाकिस्तानात पोहोचली आहे. प्रियकराला भेटण्यासाठी तिने पाकिस्तानातील लाहोर येथे पोहोचली.
पतीला खोटं सागून पाकिस्तान गाठलं
अंजूने पतीला सहलीसाठी बाहेर जात असल्याचे खोटं सांगितले. त्यामुळे पतीला अंजू पाकिस्तानाला पोहोचल्याचे खबर नव्हती. अंजू चार दिवसांपूर्वी सहलीसाठी जयपूरला जाते सांगून घरातून निघाली होती. त्यानंतर ती नक्की कुठे गेली याची माहिती नाही, पण काही दिवसांत ती परत येईल असा विश्वास अंजूच्या पतीने व्यक्त केला. अरविंदच्या म्हणण्यानुसार, अंजू Whatsapp कॉलिंगद्वारे सतत त्याच्या संपर्कात असते. २००७ मध्ये यांच लग्न झालं होतं. अंजू आणि तिचा पती दोघे ही चांगल्या नोकरीवर असल्याचे समजले आहे.
सोसल मीडियामुळे अंजू पाकिस्तानी मुलाशी तासनतास बोलायची. मैत्रीच प्रेमात रुपांतर झालं. अंजूचा प्रियकर नसरुल्ला खैबर हा पाकिस्तानमधील पख्तूनख्वाच्या दीर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. अंजूने नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानला जायचं ठरवलं. तीनं घरांना खोटं सांगून पाकिस्तान गाठलं. अंजू पाकिस्तानात व्हिटिस व्हिसाच्या साहाय्याने पोहचली आहे. भारतीय महिला पाकिस्तान असल्याची माहिती मिळताच, पाकिस्तानी यंत्रणा सर्तक झाल्याची माहिती समोर आली आहे.