चीन: कोळसा खाणीत भुकंपाचे हादरे बसल्याने 9 जणांचा मृत्यू, 10 जण गंभीर जखमी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्विटर)

चीन (China) मध्ये एका कोळसा खाणीत (Coal Mine) भुकंपाचे हादरे जाणवल्याने 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच उत्तर-पूर्व चीन मधील जिलिन प्रांत मध्ये झालेल्या या घटनेत 10 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

चीन मीडियानुसार, जिलिन प्रांतात भुकंपाचे हादरे जाणवले. त्यावेळी कोळसा खाणी काम करणारे कामगार या खाणीच्या आतमध्ये अडकले गेले. मात्र या घटनेनंतर बचाव कार्य सुरु करण्यात आले असता त्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

(ओमान-दुबई बस अपघातात 8 भारतीय नागरिकांसह 17 जणांचा मृत्यू)

तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 10 पेक्षा अधिक जण गंभीर झाले आहेत. तसेच याबद्दल पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. कोसळा खाणीत भुकंपामुळे जखमी झालेल्या कामगारांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लोंगजीबाओ माइनिंग कंपनी अंतर्गत कोळसा खणीत काम सुरु असल्याचे सांगितले जात आहे.