ओमान-दुबई बस अपघातात 8 भारतीय नागरिकांसह 17 जणांचा मृत्यू
Dubai Bus Accident (Twitter/Dubai Police, @DubaiPoliceHQ)

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ओमान (Oman) येथून येणाऱ्या बसला अपघात झाला असून त्यामध्ये 8 भारतीय नागरिकांसह 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबद्दल शुक्रवारी भारताच्या वाणिज्या दूतवासांनी याची खातरजमा केली आहे. तर मृत्यू झालेल्या काही जणांच्या संपर्कात वाणिज्य दूतवास असून अन्य व्यक्तींबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मस्कट येथून दुबईला निघालेल्या बसला गुरुवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात मृत व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. तर जखमी झालेल्यांपैकी 4 भारतीय नागरिकांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.

(अमेरिकेकडून भारताला व्यापारात 5 जून पासून कोणतीही सूट मिळणार नाही- डोनाल्ड ट्रम्प)

मात्र अन्य 3 जणांवर रशिद मधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर बस शेख मोहम्मद बिन जायद वरील रोडच्या साईन बोर्डला धडकल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे सुद्धा पोलिसांनी सांगितले आहे.