अमेरिकेतील लॉस एंजेलिस (Los Angeles) शहरातील एका धर्मगुरूकडून लहान मुलांची 600 हून अधिक आक्षेपार्ह छायाचित्रे जप्त करण्यात आली आहेत. हा पाद्री लॉस एंजेलिस परिसरातील लाँग बीच येथील चर्चमध्ये काम करत होता. अनेक महिन्यांच्या तपासानंतर आता आरोपी पाद्रीला अटक करण्यात आली आहे.
‘लॉस एंजेलिस टाईम्स’ या अमेरिकन न्यूज वेबसाइटनुसार, शहराच्या लाँग बीच भागातील 38 वर्षीय कॅथोलिक धर्मगुरू रोडॉल्फो मार्टिनेझ ग्वेरा (Rodolfo Martinez-Guevara) याला अटक करण्यात आली. तो चर्च व्यवस्थेत खूप वरिष्ठ होता. नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉइटेड चिल्ड्रेनला अनेक रिपोर्ट्स प्राप्त झाल्यानंतर मार्टिनेझ-ग्वेरावर चर्चेत आला. त्यानंतर वेंचुरा काउंटी चाइल्ड एक्स्प्लॉयटेशन अँड ह्युमन ट्रॅफिकिंग टास्क फोर्सने एप्रिलमध्ये त्याच्याविरुद्ध एक वेगळा तपास सुरू केला.
तपासात मार्टिनेझ-ग्वेराकडे 600 हून अधिक बाल लैंगिक शोषणाचे फोटोज असल्याचे आढळले. यातील बहुतांश छायाचित्रे 12 वर्षांखालील मुलांची होती. ग्वेराला बुधवारी (13 सप्टेंबर 2023) न्यायालयासमोर हजर केले गेले. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेनंतर एका निवेदनात, लॉस एंजेलिसच्या आर्कडायोसीजने म्हटले आहे की, मार्टिनेझ-ग्वेरा याला मंत्रालयातून काढून टाकले आहे.
या प्रकरणाशिवाय स्वित्झर्लंडमधूनही एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील एका संशोधनात असे आढळून आले आहे की, 1950 पासून आतापर्यंत चर्चमधील धर्मगुरू आणि इतर कर्मचाऱ्यांनी 1000 हून अधिक लैंगिक अत्याचार केले आहेत. झुरिच विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, स्विस कॅथलिक धर्मगुरू आणि कर्मचाऱ्यांनी 1000 हून अधिक लैंगिक अत्याचार केले आहेत, ज्यापैकी 74% पीडित अल्पवयीन आहेत. (हेही वाचा: Oral Sex with Minor: मुलाच्या तोंडात लिंग घालणे हा 'कमी गंभीर' गुन्हा; उच्च न्यायालयाचा निर्णय, 20 रुपये देऊन अल्पवयीन मुलासोबत मुखमैथुन केलेल्या आरोपीची शिक्षा केली कमी)
या संशोधनासाठी पीडितांशी बोलून जुन्या प्रकरणांची छाननी करण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये पुरुषांचे अधिक शोषण झाले आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की 56% बळी पुरुष होते तर 39% महिला होत्या, 5% बद्दल माहिती गोळा करता आली नाही.