England's King Charles | (Photo Credit: Archived, edited, representative images)

इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांचा थोरले चिरंजीव चार्ल्स हे इंग्लंडच्या राजेशाहाचे प्रमुख बनले आहेत. इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांचे निधन (Britain's Queen Elizabeth passes away) झाले . वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (8 सप्टेंबर) दुपारी बालमोरल (Balmoral ) येथे राणीचे निधन झाले. त्यानंतर इंग्लंडच्या परंपरेनुसार राजगाधीची सूत्रे चार्ल्स यांच्याकडे आली आहेत. ब्रिटीश साम्राज्याच्या शतकानुशतके परंपरेने चालत आलेल्या संकेतांनुसार जेव्हा राणी किंवा इंग्लंडच्या प्रमुखाचे काही कारणाने निधन होते तेव्हा, संबंधित व्यक्तीचा थोरला मुलगा/मुलगी राज्याचा प्रमुख बनतो. इंग्लंडच्या राजघराण्याच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत विस्ताराने माहिती मिळते.

दरम्यान, 73 वर्षे वयाचे चार्ल्स यांना किंग चार्ल्स तिसरा किंवा इतर कोणत्या नावाने संबोधायचे याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. मात्र, , 1701 च्या सेटलमेंट कायद्याने इंग्लंडच्या सरकारला नेतृत्वात बदल करण्याची जबाबदारी ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की, अधिकृतपणे चार्ल्सला नवीन सम्राट घोषित करण्यासाठी सेंट जेम्स पॅलेसमध्ये लवकरच एक परिषद बोलावली जाईल. प्राप्त माहितीनुसार, महाराणी किंवा साम्राज्याच्या प्रमुखाच्या मृत्यूनंतर पुढच्या अवघ्या 24 तासात त्याचा/तिचा उत्तराधीकारी निवडला जातो. त्यासाठी आयोजित करण्यात आलेली परिषद कॉमनवेल्थ देशांच्या प्रतिनिधींना आमंत्रणे पाठवली जाते. (हेही वाचा, Queen Elizabeth II of England Passes Away: इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन)

दरम्यान, इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांचे निधन (Britain's Queen Elizabeth passes away) झाले आहे. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (8 सप्टेंबर) दुपारी बालमोरल (Balmoral ) येथे राणीचे निधन झाले. पाठिमागील काही दिवसांपासून एलिजाबेथ यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांचे निधन झाले.