file photo

Canada Accident: कॅनेडाच्या मॅनिटोबो भागात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. गुरूवारी मॅनिटोबोच्या हायवे रोडवर जेष्ठ नागरिकांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला.  बस आणि ट्रक जोकदार एकमेंकांना धडकल्याने हा अपघात झाला. दुर्देवाने ह्या भीषण अपघातात 15 जणांचा जागीच मृत्यु झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

बस दक्षिणेकडील कॅरबेरी शहराजवळील कॅसिनोकडे जात होती. दरम्यान एक ट्रक विरुध्द दिशेने येत असताना धडक झाली. ह्या धडकेत बसचा भीषण अपघात झाला. ह्या अपघातात 15 जण जागीच ठार झाले आणि 10 जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिकाच्या माहितीनुसार घटनास्थळी 12 रुग्णवाहिका धावून आल्या. हेही वाचा - तमिळनाडू जिल्ह्यात ट्रकचा अपघात 

आरसीएमपीचे सहाय्यक आयुक्त राॅब हिल यांनी घटनास्थळी जावून तपास केला. त्यांच्या तपसात असे आढळून आले की बसमधील बहूसंख्य लोक डाॅफिन शहरात आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक होते.शहरात खुप मोठ्या  प्रमाणात भीषण झाला आहे यासंदर्भात राॅब हिल यांनी खंत व्यक्त केला आहे.

मॅनिटोबा शहरातच्या विधानसभेत ह्या भयावह अपघाताचे पडसाथ पडले.  शोक व्यक्त करण्यासाठी  मॅनिटोबा शहराच्या विधानसभेच्या इमारतीवरचा ध्वज खाली उतरवण्यात आला. कॅनेडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांनी देखील ट्विटरवरुन शोकांतिका व्यक्त केली आहे.