Tamil Nadu Road Accident: तामिळनाडू (Tamil Nadu) च्या थुथुकुडी (Thoothukudi) जिल्ह्यात एका विचित्र रस्ता अपघात (Accident) घडला. खते घेऊन जाणाऱ्या ट्रकची दोरी दुचाकीस्वराच्या गळ्यात अडकल्याने तरुण बाजूला फेकला गेला. नशीब बलवत्तर म्हणून हा दुचाकीस्वार वाचला. श्रीवैकुंटम शहरातील दुचाकीस्वार मुथू आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना हा अपघात झाला. तो इरळ परिसर ओलांडत असताना अचानक त्यांची दुचाकी जमिनीवर ओढली गेली.

स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले. या घटनेत मुथूला किरकोळ दुखापत झाली. जवळच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, ट्रकला बांधलेली दोरी दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकली गेली आणि तो दुचाकीवरून लांब फेकला गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (हेही वाचा - Heart Attacks In Gym: जिममध्ये कसरत करताना अचानक होणाऱ्या मृत्यूचा मुद्दा लोकसभेत उपस्थित)

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)