जिममध्ये कसरत करताना अचानक होणाऱ्या मृत्यूंच्या वाढीचा मुद्दा आज शून्य प्रहरात लोकसभेत उपस्थित करण्यात आला. गोरखपूरचे भाजप (BJP) खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांनी सांगितले की, अलिकडच्या काही महिन्यांत जिममध्ये वर्कआऊट करताना बॉलीवूडमधील त्यांच्या काही मित्रांसह अनेक लोक विशेषतः तरुणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमध्ये जीमद्वारे पुरवल्या जाणार्‍या किंवा शिफारस केलेल्या प्रोटीन सप्लिमेंट्सचा काही हात आहे का हे पाहण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने चौकशी समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली. हेही वाचा

पहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)