Camel Beauty World Cup Qatar: फुटबॉल सोबतच कतारने आयोजित केलाय 'उंट सौदर्य विश्वचषक', जाणून घ्या खास विशिष्ट्ये
Camel | Representational image (Photo Credits: pxhere)

फिफा विश्वचषक (FIFA World Cup 2022) स्पर्धा आयोजित केल्यामुळे कतार (Qatar) सध्या जगभरात चर्चेत आहे. पण कतारने केवळ फिफा विश्वचषक स्पर्धाच आयोजित केली नाही बरं. फिफासोबतच कतारमध्ये चक्क 'उंट सौदर्य विश्वचषक' (Camel Beauty World Cup, Qatar) भरविण्यात आला आहे. ज्यात अनेक उंट मालक आपले सुंदर उंट (Camel Beauty Contest) घेऊन सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये लांब पाय असलेले उंट सर्वात आकर्षक म्हणून ओळखल्या जाण्यासाठी स्पर्धा करत आहेत. ज्याची जगभरात चर्चा सुरु आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हा कार्यक्रम अश-शहानिया (Ash-Shahaniyah) येथील कतार कॅमल मझायेन क्लबमध्ये (Qatar Camel Mzayen Club) आयोजित करण्यात आला आहे. उल्लेखनीय असे की, स्पर्धेतील सहभागी उंट अनेक आखाती राष्ट्रांतील आहेत. सहभागी उंट त्यांच्या वयानुसार आणि जातीनुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. स्पर्धक असलेले आणि सहभागी उंट त्यांच्या वयानुसार आणि जातीनुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत.विविध वयोगट आणि प्रकारांच्या श्रेणींमध्ये उंटांची स्पर्धा तीव्र असते.

उंट सौदर्य विश्वचषक स्पर्धेच्या नियमानुसार उंटाचे सौंदर्य हे नैसर्गिकच असायला हवे. कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया अथवा इतर कोणतीही अनैसर्गिक कृती करुन जर उंटाला सुंदर बनवले असेल तर तो उंट स्पर्धेतून बाद होणार आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी क्ष-किरणांचा वापर करून वैद्यकीय समितीद्वारे उंटांची तपासणी केली जाते. मागिल स्पर्धेत अनैसर्गिक कृतींनी सुंदर बनवलेले 43 उंट बाद करण्यात आले होते. तेव्हापासून ही खबरदारी घेतली जात आहे. असेही आढळून आले होते की, काही मालकांनी त्यांच्या प्राण्यांना बोटॉक्स आणि फेस लिफ्ट दिल्याने त्यांच्या जिंकण्याची शक्यता वाढली होती. त्यामुळे आयोजकांनी या वर्षी कॉस्मेटिक वापरांवर कडक कारवाई केली आहे. तसेच, दोषींवर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. (हेही वाचा, असाही एक देश, जिथे भरते चक्क गोगलायींची धावण्याची स्पर्धा, विजेत्यास मिळते जबरदस्त बक्षीस)

मझायेन क्लबचे अध्यक्ष हमद जाबेर अल अथबा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, स्पर्धेची कल्पना फुटबॉल विश्वचषकासारखीच आहे. आम्ही उंट सौंदर्य विश्वचषक जाहीर केला. स्पर्धेत सहभागी झालेल्या उंटांची प्रेक्षकांसाठी एक सफरही घडविण्यात आली. ज्यात सतत काहीतरी चघळणारे उंट घरात बसलेल्या, तसेच, कॉफी आणि मिठाईचा आनंद घेत असलेल्या प्रेक्षकांना पाहायला मिळाले.