उंटाच्या एका गटाच्या (Group of Camels) बाजूने दुचाकी पास करणे एका व्यक्तीला महागात पडले आहे. सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत एक दुचाकीस्वार उंटांच्या (Camel) बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, उंटाच्या गटातील एका उटाला राग येतो आणि तो त्या दुचाकीस्वारला जोरात किक मारतो. दरम्यान, ट्राफिकच्या नियमांचे (Traffic Rule) उल्लंघन केलेल्या व्यक्तीला एका उंटाने धडा शिकवल्याचा हा गंमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. भारतीय वन अधिकारी (Indian Forest Service) सुशांत नंदा (Susanta Nanda) यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
या व्हिडिओत एका रस्त्यावरून उंटाचा गट जाताना दिसत आहे. तसेच उंटाचा गट संपूर्ण रस्ता अडवून चालत आहे. यामुळे त्यांच्यामागील वाहनांना पुढे जात येत नाही. यातच एक दुचाकीस्वार उंटाच्याजवळ पोहचतो आणि त्यांच्या किनाऱ्याहून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु, त्यावेळी एका उंटाला राग येतो आणि जोरात दुचाकीस्वारला लाथ मारतो. हे देखील वाचा- रेस्टॉरंटमध्ये छुप्या पद्धतीने घुसलेल्या पक्षाने चोरले चिप्सचे पाकिट, त्यानंतर झाला फरार; Watch Viral Video
ट्विट-
Respect lane driving🙏🏼 pic.twitter.com/u87Rbk4fNE
— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 18, 2021
सुशांत नंदा यांनी या व्हिडिओला शेअर करत रिस्पेक्ट लेन ड्राईव्हिंग असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओ 18 फेब्रुवारीला शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 15 हजाराहूंन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, 260 रिट्विटट्स आणि जवळपास दीड हजार लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया येत आहेत.