Burning Boat Video Viral (Photo Credit: YouTube)

Burning Boat Video of West Grand Traverse Bay: सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ असे असतात की अशी काही घटना घडली असेल याची आपण कल्पनाही केलेली नसते. पण अशी घटना घडलेली असते हे खरे. असे व्हिडिओ मग सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होतात. वेस्ट ग्रँड ट्रॅव्हर्स समुद्री खाडीमध्ये (West Grand Traverse Bay) घडलेल्या अशाच एका घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ जळत्या बोटीतून एका व्यक्तीने समुद्रात उडी मारल्याचा आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, खाडीच्या मध्यभागी पाण्यात एक पांडऱ्या रंगाची बोट आहे. या बोटीला अचानक आग लागल्याने धुर आणि ज्वाळा उठत आहेत. अशा स्थितीत एक व्यक्तीही या ठिकाणी बोटीवर उभा आहे. परंतू, ज्वाळाचे चटके बसतातच हा व्यक्ती तातडीने समुद्रात उडी मारतो. हा व्यक्ती काहीसा घाबरला असल्याचेही त्याच्या व्हिडओती वर्तनावरुन लक्षात येते.

एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार खाडीमध्ये उभ्या असलेल्या बोटीला लागलेल्या आगीच्या ज्वाळा तीव्र होऊ लागल्या. या ज्वाळा सहन न झाल्याने या व्यक्तीने बोटीच्या ओव्हरबोर्डवर उडी मारली. तेथेही त्याला ज्वाळांचे चटके बसू लागले. त्यामुळे त्याने पाण्यात उडी मारली. मात्र, एक गोष्ट महत्त्वाची अशी की, हा व्यक्ती नशिबवान होता. कारण एक जोडपे नॅतन ग्रीनवूड आणि त्यांची पत्नी हे जवळच बोटींग करत होते. त्यामुळे या व्यक्तीला या जोडप्याने आपल्या बोटीत घेतले. जेणेकरुन त्याचे प्राण वाचले.

व्हिडिओ

या व्यक्तीला वाचवल्यानंतर नॅथन ग्रीनवूड याने सांगितले की, मला हे स्पष्ट जाणवत होते की, या व्यक्तीने लवकर पाण्यात उडी घेतली नाही तर तो भाजला जाईल. तसेच, पाण्यात उडी घेतल्यावर त्याला लवकरात लवकर मदत पोहोचली नाही तर श्वास गुदमरुन त्याचाही मृत्यू होऊ सकतो. दरम्यान, त्याने आमच्याकडे मदतीचा हात मागितला. जो आम्ही तिला आणि त्याचे प्राण वाचले.