हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी च्या आयुष्यावर येणार सिनेमा; आमीर लियाकत साकारणार प्रमुख भूमिका
Aamir Liaquat Hussain (Photo Credits: Instagram)

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी (Burhan Wani ) याच्या आयुष्यावर आधारित लवकरच एक नवा सिनेमा येणार आहे. या सिनेमामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षातील नेते आमीर लियाकत हुसैन बुरहान वानीची भूमिका साकारणार आहेत. अयुब खोसा (Ayub Khosa) या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेमध्ये असणारे आमीर लियाकत (Aamir Liaquat) आता या नव्या सिनेमामुळे चर्चेमध्ये आले आहेत.

दिग्दर्शक अयुब खोसा यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीनुसार, काश्मिरवर आधारित एका सिनेमाची निर्मिती करणार आहे. बॉलिवूडमध्ये दाखवल्या जाणार्‍या काश्मिरची चर्चा होतो. पण स्थानिक काश्मिरी चित्रपटांची आंतरराष्ट्रीय चर्चा होत नाही असे म्हटले आहे.

हिजबुल कमांडर बुरहान वानी 2016 साली एका चकमकीत ठार झाला. त्याच्या जीवनावर आधारित या सिनेमामध्ये आमिर लियाकत काम करणार आहे.