Robbery | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Robbery in New York: ॲमेझॉन डिलिव्हरी कर्मचाऱ्याचा (Amazon Delivery Worker) गणवेश घालून आलेल्या तोतया व्यक्तीने एका घरात दरोडा टाकत (Robbery in New York) तब्बल 29 लाख रुपयांची चोरी केली आहे. ही घटना नूयॉर्क शहरात घडली. चोरट्याने चेहऱ्याला मास्क लावल्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही. मात्र, तो इमारतीत प्रवेश करताना आणि संशयास्पद कृत्य करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सांगीतले जात आहे की जानेवारी 2023 ते 5 मार्च 2024 या कालावधीत याच परिसरामध्ये अशाच प्रकारे चोरी होण्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी जवळपास नऊ अपार्टमेंटमध्ये हीच पद्धत वापरुन चोरी केली आहे.

शहरात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेबाबत फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, एक व्यक्ती ॲमेझॉन डिलिव्हरी बॉयचा गणवेश परिधान करुन रेकी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळून आला आहे. या परिसरातील पहिला दरोडा वर्षभरापूर्वी 26 जानेवारी 2023 रोजी घातला गेला. तर अशाच पद्धतीचा सर्वात अलीकडील काळातील दरोडा 5 मार्च रोजी घातल्याचे आढळून आले आहे. महत्त्वाचे असे की, डिलिव्हरी बॉय म्हणून आलेला व्यक्ती लोकांच्या घरांमध्ये खिडकीतून प्रवेश करत असल्याचे पुढे आले आहे. (हेही वाचा, Mumbai Crime News: मुलुंड येथे दरोड्यांकडून तरुणाला बेदम मारहाण, पैसे लुटून फरार, आरोपींचा शोध सुरु)

चोरट्याला प्रत्यक्ष पाहणाऱ्यांपैकी एक असलेल्या 35 वर्षीय एस्ट्रला इस्लास हिने सांगीतले की, चोरट्याने बाथरूमच्या खिडकीतून तिच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. त्याने तिच्या ड्रॉवर आणि कपाटांमधून जवळपास 9,000 डॉलर्स किमतीचा ऐवज लंपास केला. तिने सांगितले की, तिने तिच्या 12 वर्षांच्या मुलासाठी बरेच पैसे जमा केले होते. पण चोरट्याने त्यावर डल्ला मारला. (हेही वाचा, Gujarat Robbery: सुरतमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत घुसून 13.26 लाख रुपये लुटले, चोरट्यांचा व्हिडिओ व्हायरल)

न्यूयॉर्क पोस्टने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, 5 मार्चच्या प्रकरणात, तो चोरटा माणूस सनीसाइडमधील घराच्या खिडकीतून आत शिरला. त्याने सुमारे 200 डॉलर रोख आणि जवळपास 6,500 डॉलर्स किमतीचे दागिने आणि इतर ऐवज घेऊन पोबारा केला. या व्यक्तीने रोख रक्कम, दागिने आणि इतर वस्तू असे सर्व मिळून अदाजे एकूण 34,705 डॉलर किमतीचा ऐवज लुटला. आरोपी असूनही फरार आहे. न्यूयॉर्क पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पाठिमागील वर्षीही अशीच एक घटना घडली होती. ज्या घटनेचा व्हिडिओ पुढे आला होता. व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले की, दोन इसम देखभाल दुरुस्ती कर्मचारी असल्याचे भासवत दरवाजा तोडत होते आणि बेकायदेशीरपणे घरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. धक्कादाक म्हणजे दोघांकडेही पिस्तूल होते. त्यांनी घरमालकालाही बंदुकीचा धाक दाखवला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे.