ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (PM Boris Johnson) यांनी कॅरी सायमंड्स ( Carrie Symonds) हिच्यासोबत गुपचुप लग्न केल्याचे समोर आले आहे. Reuters यांनी दिलेल्या माहितीनुसार, 56 वर्षीय बोरिस यांनी वेस्टमिंस्टर कॅथेड्रमध्ये गुपचुप 33 वर्षीय कॅरी हिच्या सोबत लग्न केले. तर कॅरी ही बोरिस यांच्यापेक्षा 23 वर्षांनी लहान आहे. यापूर्वी द सन यांच्या बातमीनुसार, 2022 मध्ये ते लग्न करणार होते. यासाठी त्यांनी आपल्या परिवारासह मित्रांना सुद्धा निमंत्रण पाठवले होते. असे बोलले जात आहे की, बोरिस जॉनसन एक खासगी आयुष्य जगतात. जॉनसनच्या डाउनिंग स्ट्रिट कार्यालयातील एका प्रवक्त्याने लग्नाच्या रिपोर्ट्सवर टिप्पणी करण्यावर नकार दिला.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मध्य लंडन मध्ये झालेल्या लग्न समारंभात अखेरच्या वेळेस पाहुण्यांना बोलवण्यात आले होते. तसेच जॉनसन यांच्या कार्यालयातील बड्या सदस्यांना सुद्धा लग्नाबद्दल काहीच माहिती नव्हते. कोरोना व्हायरसची सध्याची परिस्थिती पाहता इंग्लंडमध्ये लग्नसमारंभात फक्त 30 जणांना उपस्थितीत राहण्याची परवानगी आहे. कॅथोलिक कॅथेड्रल दुपारी 1.30 वाजता अचानक बंद करण्यात आले. 33 वर्षीय सायमंड्स ही सफेद रंगाच्या कपड्यात तेथे पोहचली.(Richest Man In The World: जेफ बेझोसना मागे टाकून फॅशन इंडस्ट्रीमधील Bernard Arnault बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या नक्की काय आहे त्यांचा व्यवसाय)
Tweet:
British Prime Minister Boris Johnson marries fiancée Carrie Symonds in a secret ceremony, according to media reports: Reuters
(file photo) pic.twitter.com/VlyFU6Tyf0
— ANI (@ANI) May 29, 2021
जॉनसन आणि सायमंड्स, डाउनिंग स्ट्रिट येते 2019 मध्ये जॉनसन पंतप्रधान झाल्यानंतर ते दोघे एकत्र राहत आहेत. गेल्या वर्षात त्यांनी एंग्जेटमेंट केल्याचे जाहीर केले होते आणि त्यांना एक मुलं सुद्धा होणार आहे. तर त्यांचा मुलगा विल्फ्रेड लॉरी निकोलस जॉनसन याचा जन्म 2002 मध्ये झाला होता. या महिन्याच्या सुरुवातीलाच द सन यांनी असे म्हटले की, त्यांनी जुलै 2020 रोजी आपले मित्र आणि परिवाराला लग्नासाठी निमंत्रण पाठवले होते.
दरम्यान, जॉनसन यांना दोन वेळा घटस्फोट झाला आहे. परंतु त्यांनी किती मुलांना जन्म दिला यावर बोलण्याचे टाळले आहे. जॉनसन यांचे यापूर्वीचे लग्न एक वकील मरीना व्हिलर सोबत झाले होते. त्यांच्यासोबत 4 मुल होती पण सप्टेंबर 2018 मध्ये त्यांनी आम्ही वेगळे झाल्याची घोषणा केली होती.