Jason Holton| PC: @VisionaryVoid

Jason Holton या ब्रिटन मधील सर्वात स्थूल व्यक्तीचं त्याच्या 34 व्या वाढदिवसाच्या आठवडाभरापूर्वी निधन झाले आहे. Organ Failure मुळे त्याच निधन झाल्याचं समोर आलं आहे. Jason Holton चं वजन सुमारे 317 किलो होते. Surrey मध्ये मागील शनिवारी त्याने अखेरचा श्वास घेतला.

Royal Surrey County Hospital मध्ये Holton ला नेण्यासाठी 6 फायर फायटर्सने मदत केली असल्याची माहिती त्याच्या आईने मीडीयाशी बोलताना दिली आहे. सर्वात पहिल्यांदा Holton ची किडनी बंद पडली. त्यानंतर एकामागोमाग एका अवयवांवर परिणाम झाला आणि आठवडाभरातच त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी आठ वेळा त्याच्या जीवावर बेतलं होतं पण डॉक्टरांनी त्याला जीवनदान दिले. यंदाही त्याला वाचवलं जाईल असं वाटत होतं पण डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरल्याचे त्याची आई सांगते.

Holton ला अतिखाण्याच्या सवय त्याच्या किशोरवयीन दिवसांपासून लागली. वडीलांच्या निधनानंतर त्याला ही सवय जडली. तो दिवसाला 10 हजार कॅलरीज खायला लागला. अगदी ब्रेकफास्टला देखील तो doner kebabs खात होता.

Jason Holton च्या एअरलिफ्टचा व्हिडिओ 

Holton च्या सोयीसाठी घरातही काही गोष्टी बदलण्यात आल्या होत्या. त्याचं फर्निचर सोयीस्कर केले होते.मात्र अखेरच्या टप्प्यात तो अंथरूणाला खिळला होता. त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता.

TalkTV शी बोलताना त्याने वर्षभरापूर्वी "मला विश्वास आहे की सर्वसाधारणपणे माझ्यासाठी वेळ संपली आहे. मी आता 34 चा होत आहे. मला माहित आहे की मला काहीतरी करून पहावे लागेल." 2020 मध्ये, Holton कोसळला होता आणि त्यावेळेस 30 पेक्षा जास्त अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी त्याला तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधून क्रेनद्वारे एअरलिफ्ट केले होते. Holton ला हा काळ त्याच्या आयुष्यातील सगळ्यात त्रासदायक काळ वाटत होता.

"यामध्ये सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे आपल्याला पाहणार्‍या लोकांची संख्या. मी Whale,पाहिला होता. माझ्यासाठी तो भयपट आहे. हा सिनेमा मी पाहू शकत नव्हतो. मी रडायला सुरूवात केली. मला ही गोष्ट अपसेट करणारी होती. आता मी ब्रिटन मधील सर्वात स्थूल व्यक्ती आहे. आता लोकं माझ्याबद्दल तसा विचार करणार आहेत." असं तो म्हणाला होता.

दोन वर्षातच त्याला गंभीर स्वरूपाचा पण मिनी स्ट्रोक आला होता आणि त्यातच त्याच्या शरीरात काही रक्ताच्या गुठळ्या देखील झाल्या होत्या.