Bill Gates On Coronavirus Formula: बिल गेट्स यांचे धक्कादायक विधान म्हणाले 'विकसनशिल देशांसोबत Corona Vaccine Formula सामायिक केला जाऊ नये'
Bill Gates | (Photo Credits: Facebook)

कोरना व्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) विरोधात अवघे जग लढत आहे. अशा या कठीण काळात कोरोना व्हायरस (Coronavirus) विरोधात लढण्यासाठी कोरोना लस हाच एक जालीम उपाय मानला जात आहे. जगभरातील काही देशांनी COVID 19 नियंत्रणासाठी कोरोना लस शोधून काढली आहे. भारताचाही या देशांमध्ये समावेश होतो. या देशांची लस गरजू असलेल्या विकसित, विकसनशील आणि गरीब देशांना पुरवावी, अशी मागणी जागतीक पातळीवर होत आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक आणि जगातील प्रसिद्ध उद्योजकांपैकी एक बिल गेट्स (Bill Gates) यांनी एक विधान केले आहे. त्यांच्या विधामुळे ते मोठ्या प्रमाणावर टीकेचा विषय ठरले आहेत. स्काय न्यूज नावाच्या एका माध्यमसमूहाला दिलेल्या मुलाखतीत बिल गेट्स यांनी म्हटले आहे की, 'विकसनशिल देशांसोबत कोरोना लसीस फॉर्म्यूला (Corona Vaccine Formula) सामाईक करु नये.'

बिल गेट्स यांना विचारण्यात आले की, वॅक्सीन इटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स (स्वामित्व हक्क) मुक्त करायला हवे का? तेसच कोरोना व्हॅक्सीनचा फॉर्म्युला इतर देशांसोबत शेअर करावा का? असे केल्याने सर्वांचे कोरोना लसीकरण होईल आणि सर्वांपर्यंत मदत पोहोचू शकेन काय? यावर बिल गेट्स यांनी उत्तरादाखल सांगितले की, जगभरामध्ये कोरोना लस बनवणाऱ्या खूप साऱ्या कंपन्या आहेत. लोकही लसीकरणाबाबत गंभीर आहेत. परंतू तरीही कोरोना लसीचा फॉर्म्युला शेअर केला जाऊ नये. अमेरिकेची कंपनी जॉन्सन अॅण्ड जॉन्सन ची फॅक्टी आणि भारतातील फॅक्ट्री यात खूप फरक असतो. कोणतीही लस आपण आपल्या वैसे आणि विशेषतेने बनवतो. बिल गेट्स यांनी पुढे सांगितले की, कोरोना वॅक्सीनचा फॉर्म्युला एखाद्या रेसीपीप्रमाणे असत नाही. जो कोणाशीही शेअर केला जावा. आणि असे की, हा केवळ स्वामित्व हक्काचा प्रश्न नाही. लस बनवताना प्रचंड सावधानता बाळगावी लागते. अनेक परिक्षणं करावी लागतात. त्याच्या चाचण्या असतात. लस बनवताना प्रत्येक गोष्ट अत्यंत सावधगिरीने तयार करावी लागते. (हेही वाचा, US India Dosti: कोरोना संकटात अमेरिकेकडून भारताला वैद्यकीय मदत; मदतीची पहिली फेरी रवाना)

बिल गेट्स हे इतकेच सांगून थांबले नाहीत. तर त्यांनी पुढे असेही म्हटले की, श्रीमंत देशांनी पहिल्यांदा लसीकरणाला प्राधान्य दिले आहे यात काही विशेष आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ही गोष्ट खरी आहे की अमेरिका आणि इंग्लंड मध्ये 30 वर्षे वयांवरील लोकांनाही कोरोना लस दिली जात आहे. परंतू, ब्राझील आणि दक्षिणी अफ्रिकेत 60 वर्षांवरील लोकांना लस मिळत नाही. हे चुकीचे आहे. सर्व जग गंभीर अशा कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा अधिक सामना करणाऱ्या देशांना अल्पावधीतच कोरोना लस मिळू शकेन. बिल गेट्स यांच्या म्हणण्याचा उद्देश असा की, आगोदर विकसित देशांमध्ये कोरोना लसीकरण पूर्ण होऊ द्या, मग जगभरातील इतर देशांनाही ही लस दिली जाईल.