Bill Gates Son-In-Law: बिल गेट्स यांच्या मुलीने निवडला जोडीदार; पहा कोण आहे 'हा' नशिबवान
Jenifer Gates Boyfriend (Photo Credits: Instagram)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील दुसरे नाव, मायक्रोसॉफ्ट विंडोजचे (Microsoft Windows) मालक बिल गेट्स (Bill Gates) यांच्या कन्येने आपला जोडीदार निवडला आहे, त्यामुळे यापूर्वी स्वतःला मस्करीत बिल गेट्सचा जावई म्हणणाऱ्यांचे हार्टब्रेक झाले असेल हे निश्चित, पण चक्क अब्जाधीश गेट्स यांच्या मुलीचे हृदय जिंकणारा हा तरुण आहे कोण असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? बिल गेट्स यांची मुलगी जेनिफर गेट्स (Jenifer Gates)  हिने आपला बॉयफ्रेंड नायल नस्सार (Nayel Nassar)  याला लग्नासाठी होकार दिला आहे.जेनिफर ही 23 वर्षाची आहे तर नायल हा 29 वर्षीय आहे. नायल हा सुद्धा एका गर्भश्रीमंत घरातील आहे. अभिनेता रितेश देशमुख ने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या 'बायको' जेनेलिया ला शुभेच्छा देत शेअर केला व्हिडिओ, गाणे ऐकून तुम्हालाही होईल हसू अनावर

जेनिफर हिला नायलने प्रपोज केल्याचे आणि तिने त्याला होकार दिल्याची ही बातमी त्या दोघांनीही आपल्या इंस्टाग्राम वरून शेअर केली आहे. जेनिफरने आपल्या पोस्ट मध्ये "नायल नस्सार, तु तुझ्यासारखा केवळ तूच आहेस. तू मला अगदी सुखद धक्का दिला आहेस. पुढील आयुष्य तुझ्याबरोबर घालवण्यासाठी मी उत्सुक आहे," असे म्हणत एक गोड फोटो पोस्ट केला आहे.

जेनिफर गेट्स पोस्ट

तर, नायलने सुद्धा "तिने फायनली हो म्हंटल, आता मी जगातील सर्वात नशिबवान व्यक्ती असल्याचे मला वाटत आहे,"असं सांगत एक क्युट पोस्ट केली आहे.

नायल नस्सार पोस्ट

दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून जेनिफर आणि नायल नस्सार रिलेशनशिपमध्ये होते.पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या घोड्यांच्या शर्यतीवेळी 2016 मध्ये पहिल्यांदा जेनिफर आणि नायल यांची ओळख झाली होती. घोडेस्वारीतील आवडीमुळे हे दोघे जवळ आले. नायल हा मूळचा इजिप्तचा असून त्याच्या कुटुंबाची गल्फ मध्ये आर्कीटेक्चर कंपनी आहे. सध्या जेनिफर आणि नायल लग्न कधी करणार आहेत याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.