
बॉलिवूड सर्वाधिक चर्चेत असलेली मराठमोळी गोड जोडी म्हणजे रितेश देशमुख (Rites Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh). 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एकत्र पदार्पण केलेल्या या जोडीचे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि 3 फेब्रुवारी 2012 विवाहबंधनात अडकले. आज त्यांच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने अभिनेता रितेश देशमुख ने आपल्या सुंदर बायकोला म्हणजेच जेनेलिया ला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की तो पाहून तुम्हालाही तुमचे हसू आवरणार नाही.
या व्हिडिओ मध्ये जेनेलिया रितेशला आपल्या मोबाईलमध्ये लग्नाचे फोटो दाखवत आहे जे पाहून रितेशच्या प्रतिक्रिया पाहून एक गाणं वाजत आहे. हे गाणे ऐकून तुम्हाला त्याचा खट्याळपणा नक्कीच दिसून येईल.
पाहा व्हिडिओ
गाण्यावरून या दोघांमध्ये किती मजामस्ती चालत असेल याचा अंदाज आपल्या सर्वांना आलाच असेल. ही जोडी ब-याचदा अनेकदा पार्ट्यांमध्ये, पुरस्कार सोहळ्यांमध्ये एकत्र दिसते.
रितेश आणि जेनेलिया सोशल मिडियावर बरेच सक्रिय असतात. अलीकडेच त्यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटाला 17 वर्ष पू्र्ण झाल्यानिमित्ताने टिकटॉक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ देखली सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
जेनेलियाचा चुलबुली अंदाज आणि रितेशचा खट्याळपणा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. हाच अंदाज या खास व्हिडिओमधून त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे.