मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स (Melinda Gates) यांनी लग्नाच्या 27 वर्ष संसार केल्यानंतर आता विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच त्यांनी ट्वीटर वर एक पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. दरम्यान हे दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार असले तरीही त्यांच्या ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ (Bill & Melinda Gates Foundation) चे काम ते एकत्र सुरू ठेवणार आहेत. ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ही जगभर आरोग्य क्षेत्राशी निगडीत काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. त्यामध्ये बिल गेट्स अध्यक्ष तर मेलिंडा उपाध्यक्ष आहेत.
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि मेलिंडा यांची पहिली भेट 1987 मध्ये झाली होती. तेव्हा मेलिंडा मायक्रोसॉफ्टमध्येच प्रोडक्ट मॅनेजर पदावर होत्या. नंतर त्यांनी 1994 साली लग्न केले. या जोडप्याला 3 मुलं आहेत.
बिल गेट्स ट्वीट
— Bill Gates (@BillGates) May 3, 2021
मेलिंडा गेट्स ट्वीट
— Melinda French Gates (@melindagates) May 3, 2021
बिल गेट्स हे जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. सध्या कोविडच्या काळातही त्यांनी देशा-परदेशात लोकांसाठी मदतीचा हात दिला आहे. सीरम इंस्टिस्ट्युट च्या कोविड 19 च्या लस निर्मितीमध्ये आणि ती गरीब देशांना उपलब्ध करून देण्यासाठी देखील बिल गेट्सच्या संस्थेने सीरमला मदत केली आहे. मागील वर्षीच बिल गेट्सच्या वडिलांचे निधन झाले आहे.