पाकिस्तानमध्ये (Pakistan) महागाईने आकाशाला हात टेकले आहेत. एकीकडे कोरोना व्हायरस तर दुसरीकडे बेरोजगारी व त्यामुळे देशाची ढासळत असलेली अर्थव्यवस्था अशा अनेक समस्यांना इम्रान खान सरकार तोंड देत आहे. अशात विरोधी पक्ष सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) हे पाकिस्तान मधील प्रसिद्ध राजकारणी आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सध्या त्यांचा सरकारवर टीकास्त्र सोडल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र रातोरात हा व्हिडिओ जनतेसाठी विनोदाचे एक मोठे कारण बनत व्हायरल झाला आहे.
बिलावल भुट्टो झरदारी हे पाकिस्तानमधील वाढलेल्या महागाईची उदाहरणे देत आहेत. मात्र यामध्ये त्यांनी नमूद केलेल्या गोष्टी व त्यांची परिमाणे यांमध्ये प्रचंड गोंधळ झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, बिलावल म्हणत आहेत, ‘अंडी 200 रुपये किलो, बटाटा 100 रुपये डझन, टोमॅटो 200 रुपये डझन.’ महत्वाचे म्हणजे एका कागदावर अशाप्रकारे लिहिलेले दर ते वाचून दाखवत आहेत. यावरून सध्या ते खूपच ट्रोल होत आहेत. मुळात लिहून देणाऱ्या व्यक्तीने त्यांना इतक्या चुकीच्या गोष्टी लिहून दिल्या आणि त्यानंतर त्यांनी या गोष्टीची खातरजमा न करता त्या भर भाषणामध्ये वाचून दाखवल्या. (हेही वाचा: Pakistan Banned TikTok: भारत, अमेरिकेनंतर पाकिस्तान मध्येही चायनीज अॅप टिकटॉक वर बंदी)
Bilawal Bhutto said "Anday 200 rupay kilo, Aloo 100 rupaya darjan, tamatar 200 rupaya darjan". 😭
This product of nepotism & feudalism people root for, to be the next PM who can't differentiate between dozen & kg? Let alone speaking in Urdu. #PDMJalsaKarachi #PDMcircusInKarachi pic.twitter.com/qViq7p6obe
— Ahmad. (@Ahmadridismo) October 18, 2020
इतजेच नाही तर, ज्या प्रकारे, ज्या टोनमध्ये त्यांनी या गोष्टी वाचून दाखवल्या आहेत त्याची सुद्धा लोकांनी चेष्टा केली आहे. बिलावल फार कमी काळ पाकिस्तानमध्ये राहिले आहेत, त्यामुळे ज्या पद्धतीने ते भाषणे देतात त्याबाबत ते नेहमीच ट्रोल होतात.
New measuring units for groceries by bilawal bhutto😁😁 pic.twitter.com/sp5WBi7uJg
— رخسانہ عالم (@rukhsanaalam) October 18, 2020
Haha ye to Kam hai Apne bilawal sabzi waly ko dekha hai#BilawalBhutto #Nani420 pic.twitter.com/urZAz6zNOc
— Muhammad Tufail (@tufailkaran) October 19, 2020
Game over for Imran Khan!!#PPP #PMLN #PDMKarachiJalsa #BilawalBhutto #MaryamNawazInKarachi pic.twitter.com/7bYUSfZrhm
— Captain ZAK (@i_captainzak) October 18, 2020
दरम्यान, बिलावल भुट्टो झरदारी यांचा जन्म 21 सप्टेंबर 1988 रोजी झाला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे विद्यमान अध्यक्ष असल्याने त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. ते राजकीयदृष्ट्या प्रख्यात अशी दोन कुटुंबे, भुट्टो व झरदारी यांच्याशी संबंधित आहेत. ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचे पुत्र आहेत. भुट्टो झरदारी 13 ऑगस्ट 2018 रोजी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य झाले.