प्रतीकात्मक तस्वीर (Photo Credits: Pexels)

लोकप्रिय चायनीज अॅप (Chinese App) टिकटॉक (TikTok) वर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या (Pakistan's Geo News) वृत्तानुसार, बेकायदेशीर ऑनलाईन डेटावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशा सूचना पाकिस्तानकडून कंपनीला देण्यात आल्या होत्या. मात्र या सुचनांचे पालन करण्यास अपयशी ठरल्याने पाकिस्तानच्या टेलिकम्युनिकेशन ऑथोरिटीने (Pakistan's Telecommunication Authority) अॅपवर बंदी घातली आहे.

या निर्णयात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, "आम्ही वारंवार बेकायदेशीर डेटा रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना कंपनीला देत होतो. परंतु, कंपनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे समाधान करण्यास असमर्थ ठरल्याने अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला." यापूर्वी डेटा सुरक्षिततेच्या दृष्टीने भारत, अमेरिकेतही टिकटॉप या चायनीज अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. (टिकटॉकला टक्कर देणाऱ्या चिंगारी अॅपला युजर्सचा तुफान प्रतिसाद; गुगल प्ले स्टोअरवर तब्बल 10 लाख डाऊनलोड्स)

ANI Tweet:

पबजी हा गेम तरुणांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक असल्याचे सांगत पाकिस्तान सरकारने यापूर्वी पबजी यांसारख्या अनेक गेम्सवर बंदी घातली आहे. दरम्यान, जून महिन्यात भारताने तब्बल 59 चायनीज अॅपवर बंदी घातली होती. यात टिकटॉक, व्हिचॅट, युसी ब्राऊजर यांसारख्या अॅपचा समावेश होतो. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले होते. (TikTok Banned in US: चीनला आणखी एक मोठा धक्का! भारतानंतर आता अमेरिकेतही TikTok, WeChat App वर येणार बंदी)

अमेरिकेने देखील देशाच्या सुरक्षेचे कारण पुढे करत TikTok अ‍ॅपची मालकी कंपनी बाईटडान्स आणि वीचॅट यांच्यासोबत आता अमेरिकेमध्ये कोणतेही व्यवहार होणार नसल्याचे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले होते.