Tik Tok video app (Photo Credits: Wiki Commons)

भारत-चीन सीमा मुद्द्यावरून (India-Chinaभारताने टिकटॉकसह 59 चीनी अॅप्सवर बंदी आणली आहे. यात अजून एका देशाकडून चीनला मोठा धक्का बसला आहे. भारतापाठोपाठ आता अमेरिकेत देखील TikTok आणि WeChat या चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. येत्या 20 सप्टेंबरपासून अमेरिकेत टिकटॉक आणि WeChat अॅप डाऊनलोड करता येणार नाही. भारतापाठोपाठ अमेरिकेने घेतलेला हा निर्णय जोरदार झटका देणारा आहे.

अमेरिकेमध्ये या अॅपला हटविण्यासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता येत्या 20 सप्टेंबरपासून अमेरिकेत टिकटॉक आणि WeChat अॅप डाऊनलोड करता येणार नाही. Chinese App Banned: Baidu Search आणि Weibo अॅप्सवर भारतात बंदी; Google Play Store, App Store वरुन हटवले

29 जून रोजी भारतात टिकटॉक समवेत 59 अॅप बॅन करण्यात आले. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यात Shareit, US Browser, V-Chat आणि कॅमेरा स्कॅनर यांसारख्या अॅप्सचा समावेश होता. त्यानंतर 28 जुलैला भारत सरकारने 47 अन्य अॅप्सवर बंदी घातली. त्यानंतर 2 सप्टेंबरला भारतात पबजी समेत 118 मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली. आतापर्यंत मोदी सरकारने भारतात 224 चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे