Mobile Apps | Representational Image (Photo Credits: PTI)

भारत सरकारने चीनच्या अजून दोन अॅप्सवर बंदी घातली आहे. Baidu Search आणि Weibo हे दोन अॅप्स भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. बायडू सर्च हे सर्च इंजिन असून ते गुगल प्रमाणे काम करतं. तर वीबो हे चीनमधील ट्विटर आहे, असे म्हटले जाते. Baidu Search आणि Weibo या अॅप्सवर बंदी घातल्यानंतर हे दोन्ही अॅप्स गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरुन हटवण्यात आले आहेत. सुत्रांनुसार 27 जुलै रोजी बॅन करण्यात आलेल्या 47 अॅपच्या यादीतील हे दोन अॅप्स आहेत. Weibo हे अॅप 2009 साली चीनच्या सीना कॉर्पोरेशनमध्ये लॉन्च करण्यात आले. जगभरात Weibo चे तब्बल 50 कोटी युजर्स आहेत.

भारतात पकड मजबूत करण्याचा Baidu Search चा प्रयत्न होता. बायडू चा Facemoji कीबोर्ड अत्यंत लोकप्रिय आहे. भारतातील अॅपची लोकप्रियता वाढवण्यासाठी कंपनीचे सीईओ रॉबिन ली हे जानेवारी 2020 मध्ये आयआयटी मद्रास येथे दाखल झाले होते. आर्टिफिशल इंटेलिजेंस आणि मोबाईल कंप्यूटिंग या क्षेत्रात भारतीय टेक्नॉलॉजी इंस्टिट्यूशन्स सह काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता.

मीडिया रिपोर्ट्नुसार, सरकारने हे दोन्ही अॅप्स गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरुन हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचबरोबर देशातील इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाईडर्संना हे अॅप्स ब्लॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

29 जून रोजी भारतात टिकटॉक समवेत 58 अॅप बॅन करण्यात आले. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यात Shareit, US Browser, V-Chat आणि कॅमेरा स्कॅनर यांसारख्या अॅप्सचा समावेश होता. त्यानंतर गेल्या महिन्यात भारत सरकारने 47 अन्य अॅप्सवर बंदी घातली.