बहरीन:  नरेंद्र मोदी  यांनी घेतले श्रीनाथजी मंदिरात दर्शन; 200 वर्ष जुन्या मंदिराची पुन्हा होणार बांधणी
Shreenathji Temple (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सध्या दोन दिवसांच्या बहरीन दौर्‍यावर आहेत. आज (25 ऑगस्ट) दिवशी बहरीन मधील 200 वर्ष जुन्या भगवान श्री कृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. यासाठी सुमारे 42 लाख डॉलर खर्च केला जाणार आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी श्रीनाथजी मंदिराला (Shreenathji Temple) भेट देऊन दर्शन घेतले आहे. बहरीनला (Bahrain) भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

काल बहरीनमध्ये नरेंद्र मोदी यांनी भारतीयांशी संवाद साधला. भगवान श्रीनाथाजी सोबतच जुन्या मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी विशेष कार्यक्रमामध्ये उपस्थित राहता येणार ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बहरीन भेट ही सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पीएम मोदी यांनी विदेशी दौरा रद्द न करण्याचे जेटली परिवाराचे अपील

ANI Tweet  

श्रीकृष्णाचं हे नवं मंदिर 45 हजार वर्ग फूट क्षेत्रावर पसरलेले असेल. हे मंदीर 3 मजली असेल. यामध्ये नॉलेज सेंटर, संग्रहालय असेल. या मंदिरामध्ये हिंदूच्या लग्न विधींसाठी खास योजना केली जाणार आहे. तेथे निवासी पुजारीदेखील असतील.