Ray Dalio On Bitcoin:  जगप्रसिद्ध फंड मॅनेजर रे डालियो यांच्याकडून Cryptocurrency चे समर्थन म्हणाले, 'माझ्याकडेही आहेत बिटकॉईन'
Ray Dalio On Bitcoin | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जागतिक शेअर बाजारात टॉपचे फंड मॅनेजर म्हणून प्रसिद्ध असलेल्या रे डालियो (Ray Dalio) यांनी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrenc) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिटकॉइन (Bitcoin) चे समर्थन केले आहे. इतकेच नव्हे तर आपल्याकडेही बिटकॉईन्स असल्याचे म्हटले आहे. याशिवाय ते सांगतात की काहीसा धोका पत्करला तर त्यातून मिळणारे यशही आपल्याला तितकेच मोठे असते. जागातील सर्ात मोठ्या हेज फंड ब्रिजवाटर असोसियेट्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी असलेले रे डालिओ (Fund Manager Ray Dalio) एका मुलाखतीदरम्यान बोलत होते. त्यांनी गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक (Investment) आणि बिटकॉन काही काळ रोखून धरण्याचा सल्ला दिला.

कॉइनडेस्क वार्षीक सहमती परिषदेत बोलताना रे डालिओ यांनी आवर्जून सांगितले की, गुंतवणुकदारांमध्ये व्हर्च्यअल करन्सी असलेल्या बिटकॉईनबाबत मोठी चिंता आहे. परंतू, माझ्याकडेही काही बिटकॉईन आहेत. वे बॉंडच्या तुनेत क्रिप्टोकरन्सी एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. असे डालिओ सांगतात,'एका अब्जादिशाने मला सांगितले की, सर्वात मोठा पत्करला जाणारा धोका हीच बिटकॉईनचे यश आहे'. दरम्यना, या आधी रे डालिओ यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत संशय व्यक्त केला होता. नेव्हेंबर 2020 मध्ये एका ठिकाणी बोलताना रे डालिओ यांनी सांगितले होते की, मला वाटत नाही की क्रिप्टोकरन्सी चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल. (हेही वाचा, Bitcoin Cryptocurrency च्या माध्मयातून आता टेस्लाच्या गाड्या विकत घेता येणार, Elon Musk यांची घोषणा)

दरम्यान, डेलिो यांनी क्रिप्टोकरन्सी प्रती एका प्रतिक्रिया देतना जानेवारी 2021 च्या सुरुवातीला म्हटले होते की, बिटकॉईन आणि त्यातील सहभागी गुंतवणूकदार एक चांगला पर्याय असू शकता. दरम्यान, एलन मस्क यांचे ट्विट आणि चीनचे धोरण पाहता बिटकॉईनची किंमत सातत्याने घसरत आहे. दरम्यान, सध्या बिटकॉईनच्या दरात काहीसा फरक पडून तो वधारतो आहे. 14 एप्रिल 2021 ला बिटकॉईन $64,829 (सुमारे 48.62 लाख रुपये) इतका खाली घसरला होता. त्यानंतर तो आणखी खाली जाऊन 35202 डॉलर म्हणजेच भारती रुपयात 26.40 लाखांवर आला. याचा अर्थ सरळ आहे की, बिटकॉईन सर्वोच्च स्थानावर असताना गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 47% नुकसान सहन करावे लागले आहे. अर्था बिटकॉईनने भविष्यात चांगली कामगिरी केली तर गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा होऊ शकतो.