डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान (फोटो सौजन्य-फेसबुक)

अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यामध्ये सोमवारी रात्री फोनवरुन बोलणे झाले. त्यानंतर ट्रम्प यांनी पाकिस्तान पंतप्रधान इम्रान (Imran Khan) खान यांना सुद्धा फोन केला होता. याबाबत ट्रम्प यांनी ट्वीट करत खुद्द माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी दोन्ही देशांना जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन पेटलेला वाद-तणाव कमी करण्याचा सल्ला दिला आहे.

यापूर्वीसुद्धा ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्यसोबत बातचीत केली होती. तर ट्रम्प यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, इम्रान खान आणि नरेंद्र मोदी हे दोघे आमचे चांगले मित्र आहेत. या दोन्ही देशातील व्यापार, समान भागीदारी आणि काश्मीरच्या मुद्द्यावर तणाव कमी करण्याचा सल्ला दिला आहे.(कलम 370 रद्द केल्याने संतप्त झालेल्या पाकिस्तानला एका दिवसात 7400 करोड रुपयांचा फटका)

डोनाल्ड ट्रम्प ट्वीट:

तसेच मोदी यांच्यासोबत झालेल्या बातचीत मध्ये पाकिस्तानकडून व्यक्त करण्यात येत असलेला राग हा देशाची शांती भंग करत आहे. तर मोदी यांनी ट्रम्प यांना सीमेवरील वाढता दहशतवाद यावर चाप बसावा याबद्दल चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे.