अमेरिका: पिट्सबर्ग मध्ये फायरिंग (Photo Credit-Twitter)

अमेरिकेत पीटर्सबर्ग सिनगॉग येथे ज्यू लोकांच्या प्रार्थनास्थळावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसंच नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 11 पैकी 3 पोलिस अधिकारी आहेत. या दुर्घटनेचा पोलिस अधिक तपास करत असून जखमींना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यासाठी जवान सज्ज झाले आहेत.

पिट्सबर्ग पब्लिक सेफ्टी डिपार्टमेंटकडून एक ट्विट करण्यात आले आहे. त्यात लिहिले आहे की, "अलर्ट: विलकिन्स आणि शेडी भागात शूटर्स सक्रीय आहेत. त्यामुळे या भागांपासून दूर राहा. उपलब्ध होईल तशी माहिती पुरवण्यात येईल."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ट्विट करुन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ट्विटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले की, "स्क्विरिल हिल भागात राहणाऱ्या लोकांनी घराबाहेर पडू नका. हल्ल्यात अनेक व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. लोकांनी शूटर्सपासून सावध राहावे."