Hindu Temple Vandalised In US: अमेरिकेच्या California मध्ये अजून एका हिंदू मंदिरावर खलिस्तानी समर्थकांकडून हल्ला; आठवडाभरातील दुसरी घटना
India and America flag (PC- unsplash)

अमेरिकेच्या कॅलिफॉर्निया (California) मध्ये अजून एका हिंदू मंदिराला खलिस्तानवादी संघटनांनी लक्ष्य करत मंदिरावर काही घोषणांची ग्रॅफिटी केली आहे. अशाचप्रकारे काही दिवसांपूर्वी Swaminarayan Temple देखील लक्ष्य केले होते. हिंदू अमेरिकन फाऊंडेशन कडून X (formerly Twitter) वर Hayward मधील Sherawali Temple ला आता लक्ष्य करण्यात आले आहे. स्वामीनारायण मंदिरावर जसा 2 आठवड्यांपूर्वी ग्रॅफिटीचा प्रकार आढळला तसाच आता इथे आहे. याच भागात शिव दुर्गा मंदिरात आठवडाभरापूर्वी चोरीची देखील घटना समोर आली आहे.

HAF कडून सार्‍या मंदिराच्या प्रमुख नेत्यांना HinduAmerican temple safety guide डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंदिरातील हिंदू विरोधी ग्रॅफिटी हा द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून पात्र ठरते आणि खलिस्तान समर्थकांकडून वाढणारा धोका तसेच हिंदुद्वेषी कलाकारांकडून सर्वव्यापी जोखीम लक्षात घेऊन कार्यरत सुरक्षा कॅमेरे आणि अलार्म यंत्रणा बसवण्याचे महत्त्व यावर लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सॅन फ्रॅन्सिको च्या Consulate General of India कडून स्वामीनारायण मंदिराची विटंबना केल्याचा निषेध केला होता आणि या घटनेमुळे भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या होत्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. Indian-Origin Couple Suicide In In US: अमेरिकेतील भारतीय दाम्पत्याची आत्महत्या, शवविच्छेदन अहवालानंतर उलघडले मृत्यूचे गूढ.

परदेशात खलिस्तानी अतिरेक्यांनी हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याची ही पहिलीच घटना नाही. अशीच प्रकरणे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्येही घडली आहेत तसेच भारत सरकारने विविध प्रसंगी विविध राजनैतिक व्यासपीठांवर त्याविरूद्ध आवाज उठवला आहे.