Vandalism of Bhagvad Gita Park in Toronto (PC - ANI)

Vandalism of Bhagvad Gita Park in Toronto: कॅनडात (Canda) भारतीय आणि हिंदू प्रतीकांना लक्ष्य करण्याचा ट्रेंड थांबण्याचे नाव घेत नाही आहे. भारतीय उच्चायुक्तांनीही या प्रकरणांवर अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. आता टोरंटो (Toronto) मधील भगवद्गीता पार्क (Bhagvad Gita Park) च्या साइन बोर्डची तोडफोड करण्यात आली आहे. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनीही याचा निषेध केला असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

श्री भगवद्गीता उद्यानाच्या चिन्हाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. या घटनेची दखल घेऊन, कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी द्वेषात्मक गुन्ह्याचा निषेध केला आणि कॅनडाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा - Indonesia Violence After Football Match: इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यानंतर स्टेडियममध्ये हिंसाचार, 127 ठार; 100 हून अधिक जखमी, Watch Video)

या वृत्ताला दुजोरा देताना, ब्रॅम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी ट्विट केले की, 'नुकत्याच अनावरण केलेल्या श्रीभगवद्गीता पार्कच्या साइन बोर्डची तोडफोड करण्यात आल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. या प्रकरणात दोषी आढणाऱ्याची कोणाचीही गय केली जाणार नाही. यासाठी चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.'

भारत सरकारने जारी केली होती अॅडव्हायजरी -

23 सप्टेंबर रोजी, भारत सरकारने कॅनडातील वाढत्या गुन्हेगारी आणि भारतविरोधी कारवायांदरम्यान भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) एका निवेदनात म्हटले आहे की, कॅनडामध्ये भारतीय लोक आणि विशेषतः हिंदूंविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे वाढत आहेत, त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. नुकतेच कॅनडातील शीख लोकांमध्ये वेगळा खलिस्तान निर्माण करण्यासाठी सार्वमत घेण्यात आले होते, ज्यावर भारताने तीव्र विरोध दर्शवला होता.