महिलांना पुरुषांसोबत काम करण्यासाठी परवानगी नाही, तालिबानच्या नेत्याने मांडले मत
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

अफगाणिस्तानात (Afghanistan)  सत्ता स्थापन केलेल्या तालिबान (Taliban) मधील एका वरिष्ठ नेत्याने महिलांना पुरुषांसोबत काम करण्याची परवानगी मिळू नये असे म्हटले आहे. जर नेत्याचे हे विधान औपचारिकरित्या घेतल्यास महिलांना शासकीय कार्यालये, बँक, मीडिया आणि अन्य ठिकाणी काम करण्यासाठी बंदी असेल.(Taliban New Rule: अफगाणिस्तानातील मुली मुलांसोबत शाळेत शिकू शकतात पण सरकारने ठेवली 'ही' अट)

तालिबान नेतृत्वातील निकटवर्तीय वहीदुल्ला हासिमी यांनी म्हटले की, महिलांना त्यांच्या आवडीचे काम करण्याची परवानगी देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबावा व्यतिरिक्त शरिया पूर्णपणे लागू केला जाईल. हासिमी यांनी म्हटले, आम्ही अफगाणिस्तान मध्ये शरिया कायदा लागू करण्यासाठी चार दशकांपर्यंत लढाई केली आहे. शरिया महिला आणि पुरुषांना एकत्रित काम करण्यासह एकाच छप्पराखाली बसण्याची परवानगी देत नाही. त्यांनी पुढे म्हटले यावरुन स्पष्ट होते की, महिला आणि पुरुष एकत्रित काम करु शकणार नाहीत. महिलांना कार्यालय आणि मंत्रालयात येण्याची परवानगी देऊ नये.(Afghanistan-Taliban Conflict: तालिबानने अजून एक वचन मोडले, काबूलमधील नॉर्वेजियन दूतावासातील मुलांची फाडली पुस्तके)

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे प्रमुख मिशेल बाचेलेत यांनी असे म्हटले की, तालिबानने महिलांच्या प्रति आपली वचने पूर्ण केली नाहीत. त्यांनी मानवाधिकार परिषदेला सांगितले की, तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर त्यांनी केलेल्या गोष्टी यामध्ये खुप फरक आहे. तालिबानने सरकारमध्ये महिला, अल्पसंख्यांक, जातीय आणि धार्मिक समुदाय हे आपल्या अधिकाऱ्यांच्या प्रति चिंतेत आहेत. गेल्या तीन आठवड्यात तालिबानची वागणूक ही निराशाजनक आहे. तालिबानने म्हटले होते की, ते महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करतील पण त्यांनी असे काहीच केलेले नाही. तसेच तालिबानने माजी सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्जमाफीचे वचन पूर्ण केले नाही.