PBUG Game (फोटो सौजन्य- फेसबुक)

पबजी (PUBG) हा खेळ जगप्रसिद्ध झाला आहे. तसेच पबजी खेळणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढते आहे. मात्र पबजी खेळामुळे मानसिक संतुलन बिघडत असल्याच्या कारणाने बंदी घालण्यात यावी अशी सुद्धा मागणी केली जात आहे. परंतु अबु धाबी (Abu Dhabi) येथे नवऱ्याने बायकोला पबजी खेळण्यापासून थांबवल्यामुळे तिने चक्क घटस्फोट मागितला आहे.

पतीने पबजी खेळण्यापासून बायकोला रोखले. यावरुन त्या दोघांमध्ये जोरदात भांडण होऊन हे प्रकरण पोलिसात पोहचले. तेव्हा बायकोने मनोरंजनाच्या साधनांच्या निवडीचा माझा अधिकार नाकारला असल्याची तक्रार केली. तसेच मला पबजी खेळल्यामुळे आनंद मिळतो आहे. मात्र नवरा माझा हा आनंद हिरावून घेत असल्याने मला नवऱ्याकडून घटस्फोट हवा असल्याचे म्हटले आहे.(PUBG Addiction रोखण्यासाठी खेळावर सहा तासांची मर्यादा? Screen Shot व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण)

तर पबजीमुळे अनेकांनांचे स्वास्थ बिघडले आहे. पबजीवर नेपाळ येथे बंदी घालण्यात आली आहे. कारण अल्पवयीन मुलांसाठी हा गेम घातक असल्याचे मानले जात आहे.