क्रूरतेचा कळस! आईच्या घराचा ताबा मिळावा म्हणून एका महिलने 10 वर्षे फ्रिजमध्ये लपवले जन्मदात्रीचे शव
(संग्रहित प्रतिमा)

माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना जपानमध्ये (Japan) उघडकीस आली आहे. येथे एका महिलेने आपल्या जन्मदात्या आईचाच मृतदेह 10 वर्ष फ्रिजमध्ये (Fridge) लपवून ठेवला. टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, हा सर्व प्रकार या महिलेने केवळ आपल्या आईच्या घराचा ताबा मिळावा यासाठी केल्याचे पोलिस तपासात समोर आले. गेल्या 10 वर्षांपासून ही महिला आपल्या आईच्या शवासह आईच्याच घरामध्ये राहणार होती. 10 वर्षे हा मृतदेह तिने घरातील फ्रिजमध्ये ठेवला होता.

जपानी प्रसारमाध्यमांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार या महिलेने तब्बल दहा वर्षासाठी आपल्या अपार्टमेंटमधील फ्रिजमध्ये आईचा मृतदेह लपवला होता. योशिनो असे या आरोपी महिलेचे नाव आहे. योशिनो हिने गेल्या 10 वर्षांपूर्वी हा मृतदेह घरातील फ्रीजमध्ये ठेवला होता. कारण तिला आईचे घर कधी सोडायचे नव्हते.हेदेखील वाचा- Rajasthan: दौसा येथे एका घरातील 4 महिलांवर एकाच व्यक्तीचा बलात्कार; आरोपीवर तीन दिवसांत चार गुन्हे दाखल

आपल्या आईच्या घरात निर्धास्तपणे राहता यावे आणि आईच्या घराचा ताबा मिळावा यासाठी योशिनो इतके घृणास्पद कृत्य केले. स्थानिक क्योडो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, काही कामानिमित्ताने स्थानिक पालिकेची टीम हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील फ्लॅट रिकामी करण्यासाठी त्या घरात पोहोचली तेव्हा सदर घटना उघडकीस आले.

हा घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून येथील पोलिस अधिक तपास करत आहे. या आरोपी महिलेचा आईच्या मृत्यू कधी झाला यापासून अनेक गोष्टींची चौकशी केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी सातारा (Satara) जिल्ह्यात जवानाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. विशेष म्हणजे जवानाच्या पत्नीने भावजय आणि मेहूण्याच्या मदतीने आपल्या पतीचा काटा काढला आहे. संदीप जयसिंग पवार असं या सैनिकाचं नाव होतं. आरोपी पत्नीने पत्नीने अज्ञाताच्या मारहाणीनंतर संदीप यांचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी संदीप यांची पत्नी, भावजय आणि मेहूण्याला अटक केली आहे.