सौदी अरेबियातील (Saudi Arabia) एका व्यक्तीने 43 वर्षांत 53 वेळा लग्न करण्याचा विक्रम केला आहे. इतके लग्न करण्यामागचं कारणही या व्यक्तीने सांगितलं आहे. त्याने शांततेच्या शोधात 53 वेळा लग्न केलं. या व्यक्तीचा दावा आहे की, त्याने वैयक्तिक आनंद नव्हे तर 'स्थिरता' आणि मन:शांती मिळवण्याच्या उद्देशाने 53 वेळा लग्न केले आहे. अबू अब्दुल्ला (Abu Abdullah) असं या 63 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. अबू अब्दुल्ला यांनी सांगितलं की, "मी दीर्घ कालावधीत 53 महिलांशी लग्न केले. मी पहिले लग्न केले तेव्हा मी 20 वर्षांचा होतो आणि माझी पत्नी माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी होती,"
अबू अब्दुल्ला पुढे सांगतात की, "जेव्हा मी पहिल्यांदा लग्न केले, तेव्हा एकापेक्षा जास्त महिलांशी लग्न करण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. कारण तेव्हा मला आरामदायक वाटले आणि मला मुले झाली." मात्र, काही वर्षांनी नात्यात अडचणी निर्माण झाल्या आणि अब्दुल्ला यांनी वयाच्या 23 व्या वर्षी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या पहिल्या पत्नीला आपला निर्णय सांगितला. पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीमध्ये वाद झाला तेव्हा अब्दुल्ला यांनी तिसऱ्या आणि चौथ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. नंतर त्याने आपल्या पहिल्या दोन पत्नींना घटस्फोट दिला. (हेही वाचा -Congress Bharat Jodo Yatra: केरळमध्ये 'भारत जोडो यात्रे'साठी देणगी देण्यास नकार दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजी विक्रेत्याला केली मारहाण, Watch Video)
अब्दुल्ला म्हणाले की, त्याच्या अनेक विवाहांचे साधे कारण म्हणजे त्याला आनंदी ठेवणारी स्त्री शोधणे. अब्दुल्ला यांनी आपल्या सर्व पत्नींशी प्रामाणिक राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. अब्दुल्ला यांचा सर्वात कमी कालावधीचा विवाह फक्त एक रात्र टिकला. 63 वर्षीय अब्दुल्ला यांनी बहुतांश सौदी महिलांशी लग्न केले असले तरी, त्यांनी परदेशातील व्यावसायिक प्रवासादरम्यान विदेशी महिलांशी विवाह केल्याचेही मान्य केले आहे.
जगातील प्रत्येक पुरुषाला वाटतं की, आपल्यासोबत नेहमी एक स्त्री असली पाहिजे. शांतता ही तरुणीसोबत नाही तर जास्त वयाच्या महिलांमध्ये दिसून येते, असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. अब्दुल्लाने आता एका महिलेशी लग्न केले आहे असून आता पुढे लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.