Brisbane Teachers Raunchy Calendar (PC - You Tube/@ 7NEWS Australia)

Brisbane Teachers Raunchy Calendar: ऑस्ट्रेलिया (Australia) मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्रिस्बेन (Brisbane) येथील बालमोरल स्टेट हायस्कूलमध्ये शिक्षकांचे कमी कपडे घातलेले फोटो असलेले विकृत कॅलेंडर (Raunchy Calendar) सध्या सोशल मीडियावर लिंक झाले आहे. या विचित्र कॅलेंडरमुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे. कर्मचाऱ्यांच्या फोटोशूटमधील चित्रांनी भरलेले कॅलेंडर लीक झाल्यानंतर हायस्कूलला फटकारण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन हायस्कूलवर आक्षेपार्ह कॅलेंडरबद्दल टीका करण्यात आली आहे. या कॅलेंडरवरील फोटोमध्ये एका शिक्षिकेने चमकदार सोन्याची मॅनकिनी घातलेली दिसत आहे.

याशिवाय या कॅलेंडरवर इतर शिक्षकांचेही कमी कपड्यातील फोटो आहेत. यातील एका फोटोमध्ये एका शिक्षकाने दुसऱ्या एकावर दुधाचा डबा ओतलेला फोटो दाखवण्यात आला आहे. तसेच एका महिला कर्मचारी सदस्याने पूर्ण ननचा पोशाख परिधान केलेला दिसत आहे. तथापी, एका महिलेने मॅनकिनी घातलेल्या पुरुष कर्मचारी सदस्याच्या पाठिवर पाय ठेवल्याचंही फोटोमध्ये दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तोच शिक्षक मॅनकिनीमध्ये, त्याच्या डेस्कवर पाय पसरून, एका हातात पेन आणि दुसऱ्या हातात फोन घेऊन पोज देत आहे. तिसऱ्या प्रतिमेमध्ये शिक्षक एका कर्मचारी सदस्यावर दुधाचे पॅकेट ओतताना दिसत आहे. वृत्तानुसार, फोटो 2023 च्या शिक्षक कॅलेंडरसाठी हे फोटो काढण्यात आले होते. विशेष म्हणजे हे कॅलेंडर स्टाफ रूममध्ये लावण्यात आले होते. (हेही वाचा - French Man Discovered Dinosaur: फ्रान्सच्या व्यक्तीने कुत्र्याच्या सहाय्याने शोधला 70 दशलक्ष वर्षे जुना डायनासोर- मीडिया रिपोर्ट)

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कर्मचाऱ्यांच्या तक्रारीमुळे कॅलेंडरचे अस्तित्व नाकारण्यात आले होते. आता एका व्हिसलब्लोअरने ते लोकांच्या लक्षात आणून दिल्याचे सांगण्यात येत आहे. फोटो लीक झाल्यापासून शाळेवर जोरदार टीका होत आहे. क्वीन्सलँडच्या माजी मुख्याध्यापक ट्रेसी टुली यांनी टुडे शोला सांगितले की, हे फोटो शाळेच्या प्रतिष्ठेला कलंकित करणारे आहेत. हा शाळा, पालक, समाज, विद्यार्थी आणि इतर शिक्षकांचा हा संपूर्ण अनादर आहे. हा काही विनोद नाही. ही एक प्रवेशद्वार शाळा आहे. (हेही वाचा, UK: ब्रिटनमध्ये सापडले 110 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या Dinosaurs च्या सहा प्रजातींच्या पायांचे ठसे; 80 सेमी रूंद व 65 सेमी लांब)

पहा व्हिडिओ - 

तथापी, शिक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून अशी वागणूक अपेक्षित नव्हती. या घटनेची मंत्रालय सखोल चौकशी करेल. विभाग सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेच्या बंधनांमुळे अधिक माहिती प्रदान करण्यात आम्ही अक्षम आहोत.