फ्रान्समध्ये तब्बल 70 दशलक्ष वर्षे जुन्या डायनासोरचे अवशेष आढळून आल्याचा दावा केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण फ्रान्समधील पॅलेओन्टोलॉजी (French Paleontology) डॅमियन बोशेट्टो नामक एक व्यक्ती आपल्या लाडक्या कुत्र्यासोबत मॉन्टौलियर्सच्या जंगलात फिरत होता. दरम्यान, त्याचा कुत्रा (Walking Dog) एका खडकाजवळ कशालातरी अडखळला. कुत्रा का अडखळला म्हणून हा व्यक्ती जवळ गेला तर त्याला प्राण्याची हाडे आढळून आली. धक्कादायक म्हणजे ही हाडे साधीसुधी नव्हती, आजवर पाहिलेल्या कोणत्याही ज्ञात प्राण्यपेक्षा काहीशी लांब आणि रुंद होती. त्याने आणखी खाली शोध घेतला असता त्याला आढळून आले की, हाडे डायनासोर (Dinosaur) प्रजातीतील प्राण्याची असावीत.
डायनासोरच्या हाडांसाठी उत्खनन
सीबीएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, खडकाच्या खाली असलेला हा सांगाडा बाहेर काढण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागला. आतापर्यंत हा सांगाडा जवळपास 70% बाहेर काढण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर तो जवळपास 30 फूट इतका लांब आहे. पुरातत्व आणि पॅलेओन्टोलॉजिकल कल्चरल असोसिएशनच्या सदस्यांसह बोशेटो यांनी 10 दिवसांच्या उत्खणनात मेहनतीने हाडे काढली, असे वृत्त माध्यमसंस्थेने दिले आहे. (हेही वाचा, UK: ब्रिटनमध्ये सापडले 110 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या Dinosaurs च्या सहा प्रजातींच्या पायांचे ठसे; 80 सेमी रूंद व 65 सेमी लांब)
डायनासोरचा सांगाडा दुर्मिळ
दावा केला जात आहे की, डायनासोरचा हा सांगाडा अतिशय दुर्मिळ आहे. त्यामुळे तो क्रुझी म्युझियममध्ये ठेवला जाणार आहे. हा सांगाडा पर्यटक, अभ्यासक आणि नागरिक यांना पाहण्यासाठी खुला असेल. क्रुझी म्युझियमचे संस्थापक फ्रान्सिस फेजहा सांगाडा शोधण्याचे श्रेय डॅमियन बोशेट्टो यांना देतात. या शोधामुळे जीवाश्मविज्ञानाच्या उत्कटतेचा अलिकडील काळातील मोठा पुरावा सापडल्याचेही ते म्हणतात. फ्रान्सिस फेजहा पुढे बोलताना सांगतात की, गेल्या 28 वर्षांपासून संशोधकांना दक्षिण फ्रान्समधील क्रूझी या छोट्या गावात डायनासोर आणि इतर प्रजातींचे जीवाश्म सापडले आहेत. हा शोध या प्रदेशातील पॅलेओन्टोलॉजिकल संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. दक्षिण फ्रान्समधील क्रूझी या छोट्याशा गावात सुमारे तीन दशकांपासून संशोधकांनी डायनासोर आणि इतर प्रजातींचे जीवाश्म शोधून काढले आहेत. तथापि, बॉशेटोच्या शेजारच्या मॉन्टौलियर्स शहरातील शोधामुळे शोध आणि अभ्यासासाठी नवीन मार्ग खुले झाले आहेत. (हेही वाचा, Real Dinosaur Cloned in China? Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क)
अभ्यासक आणि संशोधकांनी केलेला अभ्यास आणि काढलेल्या निष्कर्षानुसार, डायनासोर हा सरपटणाऱ्या प्राण्यांचा एक समूह आहे. ज्यांनी 140 दशलक्ष वर्षांहून अधिक काळ (जगाच्या काही भागात 160 दशलक्ष वर्षांहून अधिक) वर्चस्व गाजवले. हे डायनासोर विविध आकारातील आणि प्रकारातील होते असे मानले जाते. विद्यान स्थिती एकही डायनासोर भूभागावर अद्याप तरी आढळून आला नाही. तरीही, त्याचे काही ठिकाणी आवशेष मात्र जरुर आढळून आले आहेत. जीवसृष्टी बदलत गेली त्याप्रमाणे डायनासोरला स्वत:मध्ये बदल करता आला नाही. परिणामी ही प्रजाती पृथ्वीतलावावरुन नामशेष झाली, असे अभ्यासकांनी काढलेल्या निष्कर्षात म्हटले आहे.