मोठ्या हौसेने बांधला तब्बल 5 अब्ज रुपयांचा बंगला; कोर्टाने दिला पाडण्याचा आदेश, जाणून घ्या कारण 
Chateau Diter (संग्रहित संपादित प्रतिमा)

घर हे जवळजवळ प्रत्येकाचेच स्वप्न असते. अनेकजण आपला स्वप्नबंगला बांधण्यासाठी करोडो रुपये खर्च करतात, मात्र इतक्या मेहनतीने बांधलेले घर पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळणार असे समजले तर? जगाच्या पाठीवर कोणालाही याचा धक्का बसेल. आता असेच एक प्रकरण फ्रांसमध्ये घडले आहे. पॅट्रिक डायटर (Patrick Diter) हा ब्रिटीश कोट्याधीश आहे. पेट्रिकने प्रोव्हन्स, फ्रान्समध्ये 70 दशलक्ष डॉलर्सचा बंगला बांधला होता. भारतीय चलनानुसार ही किंमत जवळपास 5 अब्ज रुपये आहे. आता कोर्टाने पॅट्रिकचा हा बंगला पाडण्याचे आदेश दिले आहेत. योग्य परमिट न घेता हा बंगला बांधल्याने कोर्टाने हा आदेश दिला आहे.

इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार पॅट्रिकने आपल्या बंगल्याला Chateau Diter असे नाव दिले आहे. हा एक कस्टम बिल्ड बंगला आहे. फ्रेंच हायकोर्टाने डिसेंबरमध्ये हा बंगला पाडण्याचा निर्णय दिला. ज्यात असे म्हटले आहे की, 3200 चौरस फूट बंगला तोडण्यासाठी पेट्रिककडे अवघ्या 18 महिन्यांचा कालावधी आहे. हा बंगला बांधण्यासाठी पॅट्रिकने खूप मेहनत घेतली आहे. 2005 ते 2009 असे चार वर्षे बंगल्याचे बांधकाम चालू होते. त्यात इटलीचे मौल्यवान दगड वापरण्यात आले आहेत.

पेट्रिकची ही संपत्ती Monaco जवळ आहे. येथे दोन हेलिपॅड तयार केले गेले आहेत. इथे 17 एकरात बाग पसरली आहे. या बंगल्यात 18 खोल्या आहेत. त्याने बंगल्यात अनेक उत्तम चित्रकारांची महागडी पेंटिंग्जही ठेवली आहेत. भिंती आणि छतावरही फ्रेस्को पेंटिंग केले आहे. या बंगल्यात रिसेप्शन रूम आहे. येथे एक लायब्ररी, चित्रपट पाहण्यासाठी एक स्क्रीनिंग रूम, लाउंज, अनेक डायनिंग रूम, स्टीम रूम, एक कर्मचारी स्वयंपाकघर आणि एक वाइन टेस्टिंग रूम आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते प्रसिद्ध वेडिंग डेस्टीनेशन आहे. (हेही वाचा: Melbourne: ऑस्ट्रेलियाचे माजी वर्ल्ड विजेते Ricky Ponting यांच्या घरी दरोडा, चोरली कार)

माहितीनुसार, पेट्रिकने बिल्डिंग परमिट घेतले होते. परवान्याची कागदपत्रे येण्यापूर्वीच त्याने बांधकाम सुरू केले. बंगल्यात जे काही बांधले जात होते त्या सर्व गोष्टींचा उल्लेख परमिटमध्ये नव्हता, म्हणूनच कोर्टाने हा बंगला पडण्याचे आदेश दिले आहेत.