![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/89-195-380x214-1-.avif?width=380&height=214)
Kushinagar Mosque Demolition: उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची मुदत संपल्यानंतर जिल्हा प्रशासनाने १९९९ मध्ये बेकायदेशीर पद्धतीने बांधलेली मशीद पाडण्याचे काम सुरू केले आहे. कडक बंदोबस्तात रविवारी सकाळी १० वाजता बुलडोझरने तीन मजली मदनी मशीद पाडण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील हाटा नगरपालिका क्षेत्रातील मदनी मशिद शुक्रवारी प्रशासनाने पाडण्यास सुरुवात केली होती. मशिदीचा काही भाग सरकारी जागेवर बेकायदा बांधण्यात आल्याचा प्रशासनाचा दावा आहे, ज्यामुळे पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश ८ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आल्यानंतर बेकायदेशीर पद्धतीने बांधलेली मशीद पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मशीद समितीला नकाशा आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्यास तीन वेळा सांगण्यात आले होते, परंतु कागदपत्रे वेळेत न दिल्याने मशीद बेकायदेशीर पद्धतीने बांधलेली असल्याचे मानले गेले. उच्च न्यायालयाची स्थगिती 8 फेब्रुवारी रोजी संपताच मोठा पोलिस बंदोबस्त आणि पाच बुलडोझरसह ही कारवाई करण्यात 9 तारखेला करण्यात आली आहे. हिंदू राष्ट्रवादी संघटनेच्या तक्रारी स्थानिक हिंदू राष्ट्रवादी नेते राम बच्चन सिंह यांनी या बेकायदा बांधकामाबाबत अनेकदा तक्रारी केल्या होत्या, परंतु मागील सरकारने कोणतीही कठोर कारवाई केली नाही.
मदनी मशिद पाडली, येथे पाहा फोटो
कुशीनगर में मदीनी मस्जिद को बुलडोजर से तोड़ने की कार्रवाई, प्रशासन ने मस्जिद के अवैध हिस्से को ध्वस्त किया, मस्जिद के पक्षकारों को तीन बार नोटिस जारी किया गया !!
उत्तर प्रदेश के कुशीनगर जिले के नगर पालिका हाटा में मदीनी मस्जिद को लेकर छिड़े विवाद के बीच प्रशासन ने आज सख्त कदम… pic.twitter.com/qsE6wNQznN
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) February 9, 2025