9 Rings In Penis

9 Rings In Penis: एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीने कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रायव्हेट पार्टमध्ये 9 धातूच्या अंगठ्या लावल्या. व्यक्तीने कार्यक्षमता सुधारण्यासाठी केलेला हा प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. युरोलॉजी केस रिपोर्ट्स या वैद्यकीय जर्नलमध्ये 'पेनाईल स्ट्रॅंग्युलेशनचे दुर्मिळ प्रकरण' या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. लेखकांच्या मते, 44 वर्षीय पीडितेला त्याच्या लिंग आणि अंडकोषाभोवती स्टेनलेस स्टीलच्या रिंग अडकल्यामुळे आपत्कालीन कक्षात नेण्यात आले. नशेच्या अवस्थेत कथितरित्या लैंगिक संभोग करताना अंगठ्या लिंग ताठ ठेवण्यासाठी त्या व्यक्तीने वापरल्याचं सांगण्यात येत आहे. सुमारे तीन तासांनंतर, त्या व्यक्तीला तीव्र वेदना होऊ लागल्या. इरेक्शनसाठी प्रायव्हेट पार्टमध्ये अंगठी घालण्याचा अयशस्वी प्रयोग झाल्यानंतर असह्य वेदना त्याला झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागले.

हॉस्पिटलमध्ये केलेल्या चाचण्यांनंतर असे आढळून आले की, त्याच्या पोटाचा आणि मांडीचा मधला भाग सुजला होता, डॉक्टरांनी पीडितेला भूल दिली, जेणेकरून त्याचा त्रास कमी होईल. त्यानंतर शल्यचिकित्सकांनी 0.4 इंच व्यासाच्या बोल्ट कटरच्या साहाय्याने स्टेनलेस स्टीलच्या रिंग काढण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही, त्यानंतर त्यांनी रिंग कापण्यासाठी स्थानिक अग्निशमन विभागाची मदत घेतली. पॉवर टूल्ससह अशा नाजूक शस्त्रक्रिया करण्याच्या जोखमीमुळे, शल्यचिकित्सकांनी कोणतेही अपघात टाळण्यासाठी पुरुषाचे जननेंद्रिय आणि करवत यांच्यामध्ये डिप्रेसर ठेवले. सलाईन सोल्युशनने लिंग निर्जंतुक केल्याने करवतीच्या थर्मल इजा होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.

शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी रुग्ण पूर्णपणे बरा झाला नाही. त्यानंतर रुग्णाची सिस्टोस्कोपी करण्यात आली, ज्यामध्ये मूत्राशयाच्या आत पाहण्यासाठी पातळ कॅमेरा वापरण्यात आला आणि असे आढळून आले की रुग्णाच्या मूत्रमार्गात सूज आली आहे, ज्यासाठी डॉक्टरांनी एका आठवड्यासाठी कॅथेटर बसवण्याचा निर्णय घेतला.