Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Paris Fire: पॅरिसमध्ये मंगळवारी (5/2/2019) मध्यरात्री एका रहिवासी इमारतीला आग लागली. या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एरॅंगलर स्ट्रीटवरील आठ मजली इमारतीमध्ये आग लागली असून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 30 गाड्या दाखल झाल्या आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, बचावकार्य सुरु असल्याने हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.