लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुस-या स्थानी असलेल्या भारताने (India) एका वेगळ्या कारणासाठी अव्वल स्थान पटकाविले आहे. ते म्हणजे 1 जानेवारी 2020 मध्ये भारतात सर्वाधिक 67,385 बाळांनी जन्म घेतला आहे. 1 जानेवारीत देशात सर्वाधिक जन्मलेल्या बाळांच्या यादीत भारताने अव्वल स्थान पटकावले असून चीन दुस-या स्थानावर आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 46,229 बालकांनी जन्म घेतला. लोकसंख्येच्या बाबतीत अव्वल स्थानावर असलेल्या चीनला भारताने याबाबतीत मागे टाकले आहे. त्यांच्यापाठोपाठ नायजेरियात 26,039, पाकिस्तानात 13,020 तर इंडोनेशियात 13,020 बालकांनी जन्म घेतला.
मटाने दिलेल्या वृत्तानुसार, युनीसेफने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. नव्या वर्षाची सर्वत्र धामधुम सुरु असताना 1 जानेवारी फिजी देशात सर्वात पहिले बाळ जन्माला आले.
हेदेखील वाचा- World Breastfeeding Week: स्तनपान करताना काय काळजी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर
त्याचबरोबर 1 जानेवारीला शेवटच्या जन्माची अमेरिकेच्या नावे नोंद झाली आहे. जगातील बालकांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी जागतिक स्तरावर काम करणाऱ्या युनिसेफने 1 जानेवारी या दिवशी जन्माला आलेल्या बालकांसाठी स्वागताचा कार्यक्रम आयोजित करत शुभेच्छा दिल्या.
सध्या सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्याचे फॅड वाढत चालले आहे. यात गरोदर महिलेला जास्त त्रास होत नाही. त्यामुळे बहुतेक महिला स्वत:हून नैसर्गिक पद्धती ऐवजी सिझेरियन पद्धत वापरुन प्रसूती करतात. त्यात अनेक पालकांची इच्छा असते आपले बाळ नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारीला जन्मावे. म्हणून काही महिला सिझेरियन पद्धतीद्वारे आपल्या आवडत्या दिवशी प्रसूती करून घेतात.