अमेरिकेमधील 64 वर्षीय महिलेने Switzerland च्या विवादित ‘Suicide Pod’ मध्ये आपलं आयुष्य संपवलं आहे. दरम्यान हीच महिला ‘Suicide Pod’ द्वारा जीवन संपवणारी पहिली महिला आहे. या प्रकरणी आता काहींना अटक झाली आहे. BBC च्या वृत्तानुसार, यामध्ये जीवन संपवलेल्या महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या संशयावरून ही अटक करण्यात आली आहे.
Sarco या 3 डी प्रिंटेट चेंबर मध्ये बसून अमेरिकन महिलेने आयुष्य संपवलं आहे. sarcophagus हा सुसाईड पॉड आहे. यामध्ये बसून एक बटण दाबताच आयुष्य संपवता येऊ शकतं. पण या “Sarco” वरून अनेक वाद आहेत. Double ‘Suicide Pod’ मध्ये 46 वर्ष संसार केलेलं ब्रिटीश जोडपं एकत्र कवटाळणार मृत्यूला; पत्नीला Dementia चं निदान झाल्याने घेतला निर्णय.
Swiss-German border जवळ असलेल्या Merishausen भागामध्ये woodland retreat मध्ये पॉडचा वापर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांना याची टीप मिळाली होती. लॉ फर्म कडून मिळालेल्या माहितीवरून या Sarco च्या वापराची माहिती मिळाली होती.
Switzerland मध्ये ए ला परवानगी नाही पण assisted dying वैध आहे. अनेक वर्षांपासून त्याला परवानगी असली तरीही त्यासाठी कडक नियमावली आहे. सध्या या suicide pod वरून अनेक कायदेशीर आणि नैतिक प्रश्न उभे आहेत.
पॉड च्या आतील बटण वापरून ऑपरेट केले जाऊ शकते, ज्यामुळे कोणत्याही वैद्यकीय देखरेखीशिवाय त्यांचे जीवन संपवू शकतात.
The Last Resort organisation कडून जुलै महिन्यात Zurich ला वैद्यकीय मदतीशिवाय मृत्यू कवटाळण्याच्या मशिनला देण्यात आलं होतं. नंतर त्यांनी केलेल्या दाव्यानुसार येत्या काही महिन्यातच ते पहिल्यांदा वापरलं जाणार आहे. याच्या वापरासाठी Switzerland मध्ये कोणताच अडथळा नसल्याचं म्हटलं होतं.
AFP च्या निवेदनात, द लास्ट रिसॉर्टने सांगितले की, मरण पावलेली व्यक्ती 64 वर्षीय महिला आहे, ती midwestern United States ची होती.