Old Couple | Pixabay.com

यूके मध्ये एका वृद्ध जोडप्याने आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण एकत्र संपवण्याच्या निर्णय घेतला आहे. ‘suicide pod’ च्या मदतीने ते या जगाचा निरोप घेणार आहेत. Peter आणि Christine Scott असं या जोडप्याचं नाव असून इंग्लंड मध्ये ते Suffolk मध्ये राहतात. Christine यांना सुरूवातीच्या टप्प्यातील vascular dementia चं निदान झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचं वृत्त News.com.au ने दिलं आहे.

Peter आणि Christine Scott या जोडप्याच्या लग्नाला 46 वर्ष झाली आहेत. Switzerland मध्ये आत्महत्या सुकर करण्यासाठी केलेल्या खास पॉड मध्ये आता या सहजीवनाचा शेवट करणार आहेत. दरम्यान Switzerland मध्ये 1942 पासून स्वेच्छेने मरण स्वीकारणं हे कायदेशीर आहे.

Australian Dr Philip Nitschke यांनी Sarco machine बनवलं आहे. यामध्ये आत्महत्या च्या माध्यमातून जीवन संपवलं जाऊ शकतं. ही एक प्रकारची capsule आहे जी कार प्रमाणे दिसते. 3डी प्रिंट असलेल्या या कॅप्सुल मध्ये नायट्रोजन भरला जातो. हा नायट्रोजन कॅप्सुल मधील ऑक्सिजनला कमी करतो. मिनिटाभरामध्ये आतील व्यक्तीची शुद्ध हरपते. ही प्रक्रिया त्रास न देताना मृत्यूला कवटाळणारी आहे. आजूबाजूचा ऑक्सिजनच संपल्याने व्यक्ती गुदरमरून मरते.

Peter आणि Christine Scott यांनी आयुष्याचा उत्तरार्ध घालवण्याचा संघर्ष, आर्थिक जुळवाजुळव करून करावा लागणारा हॉस्पिटलचा खर्च टाळण्यासाठी आत्महत्येचा पर्याय निवडला आहे.

Peter हे Royal Air Force pilot होते. त्यांना आपल्या पत्नीला, जी स्वतः नर्स म्हणून इतरांची काळजी घेत होती तिला आता dementia मधून जाताना पाहून त्रास होत आहे. असे म्हटलं आहे. 'मला पत्नीशिवाय राहता येणार नाही. नुसतं बेड वर पडून राहणं मला जमणार नाही. हे आयुष्य नसतं' अशी भावना त्यांनी The Daily Mail शी बोलताना व्यक्त केली आहे. Switzerland मध्ये लवकरच मृत्यू कवटाळण्यासाठी फक्त एक बटण दाबण्याचा अवकाश; Portable Suicide Pods द्वारा वैद्यकीय देखरेखीशिवाय घेता येणार जगाचा निरोप .

England आणि Wales मध्ये आत्महत्या हा गुन्हा आहे. अशाप्रकारे आयुष्य संपवणारा आढळल्यास त्याला 14 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. या जोडप्याने आपल्या आयुष्याचा शेवट ठरवला आहे. ज्यामध्ये त्यांना Swiss Alps मध्ये एकत्र चालायचे आहे. एकमेकांसोबत मासे-वाईन खायचे आहेत. गाणी ऐकायची आहेत.

"दोन लोकांसाठी कॅप्सूल सिंगल सारको प्रमाणेच काम करते परंतु फक्त एक बटण आहे म्हणून ते त्यांच्या दरम्यान ठरवतील की ते कोण पुश करेल. मग ते एकमेकांना धरून ठेवू शकतील.” असे Dr Nitschke यांनी The Daily Mail ला सांगितले आहे.