Shooting | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

US Mass Shooting: अमेरिकेत पुन्हा एकदा अंदाधुंद गोळीबाराची (Mass Shooting) घटना घडली आहे. मिसिसिपी (Mississippi) मध्ये रॅपिड गोळीबार (Shooting) करण्यात आला. शुक्रवारी (17 फेब्रुवारी) ग्रामीण अर्काबुतला काउंटीमध्ये एका व्यक्तीने गोळीबार केला. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आधी एका दुकानात आणि नंतर इतर ठिकाणी गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मिसिसिपी ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे मार्टिन बेली म्हणाले की, ते तपासात मदत करत आहेत.

टेट काउंटी, मिसिसिपी येथे शुक्रवारी गोळीबाराच्या मालिकेनंतर किमान सहा जणांचा गोळ्या झाडून मृत्यू झाला, असे सीएनएनचे वृत्त आहे. या घटनेप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मिसिसिपीचे गव्हर्नर टेट रीव्हस यांनी सांगितले की, त्यांना गोळीबाराची माहिती देण्यात आली होती. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. (हेही वाचा -Turkiye Earthquake: तुर्कीमध्ये भूकंपाच्या 260 तासांनंतर वाचला 14 वर्षांच्या उस्मानचा जीव! तुर्कीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती)

मिसिसिपीचे गव्हर्नर टेट रीव्हस यांनी ट्विट केले की, गोळीबाराच्या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने एकट्याने ही घटना घडवून आणली असा आमचा विश्वास आहे. त्याचा हेतू अद्याप कळू शकलेला नाही. आम्ही परिस्थितीचा तपास करत राहू. कृपया या दुःखद हिंसाचारातील बळी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करा. मिसिसिपी ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (MBI) ला या तपासात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोळीबारात 6 जणांचा मृत्यू -

टेट काउंटी शेरीफ ब्रॅड लान्स यांनी सांगितले की, सर्व गोळीबार अर्काबुतला समुदायामध्ये झाला. त्यांनी सांगितले की, पहिली गोळीबाराची घटना अर्काबुतला रोडवरील एका दुकानात घडली, जिथे एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार करण्यात आले. अर्काबुतला डॅम रोडवरील घरात एका महिलेचाही मृत्यू झाला. या घटनेत तिचा पती जखमी झाला, मात्र त्याला गोळी लागली की नाही हे स्पष्ट झालेले नाही. प्राप्त माहितीनुसार या घटनेत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे.