14-year-old Osman (PC - Twitter/@drfahrettinkoca)

Turkiye Earthquake: देव तारी त्याला कोण मारी, ही ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल, पण याचे जिवंत उदाहरण तुर्की (Turkiye) मध्ये पाहायला मिळाले आहे. 6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर 11 दिवसांनी 14 वर्षीय उस्मानची सुखरूप सुटका करण्यात आली. तुर्कीचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी ट्विट करून उस्मानबद्दल माहिती दिली. भूकंपानंतर 260 तासांनंतर बचावलेल्या उस्मानला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, 14 वर्षीय उस्मान 260 तासांनंतर पुन्हा आमच्यासोबत आहे. सध्या त्यांच्यावर हाताय मुस्तफा कमाल विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मी मुलासोबत आहे. आरोग्यमंत्र्यांनी उस्मानचा फोटोही शेअर केला आहे. (हेही वाचा-Turkey Earthquake: तुर्कस्तानमध्ये विनाशकारी भूकंपानंतर सुमारे 198 तासा मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 2 जणांची सुखरुप सुटका (व्हिडिओ))

वृत्तानुसार, तुर्कस्तानच्या हाते प्रांतात गुरुवारी रात्री बचाव कर्मचार्‍यांनी दोन जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. खरं तर, शोध आणि बचाव पथकांना 26 वर्षीय मेहमेट अली आणि 34 वर्षीय मुस्तफा अवसी हे ढिगाऱ्याखाली दबलेले आढळले. त्यानंतर बचावकर्त्यांनी त्यांना तात्काळ मदत करत दोघांचीही ढिगाऱ्यातून सुटका केली.

आरोग्यमंत्र्यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भाई मेहमेत अली हे आमचे दुसरे नागरिक आहेत, ज्यांना 261 तासांनंतर ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर मैदानी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर मुस्तफा केमाल विद्यापीठ रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या 41,000 च्या पुढे गेली आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. बचाव कर्मचारी ढिगाऱ्यांखाली शोध मोहिम राबवत आहेत.