
अफगानिस्तानातील तखार प्रांतात तालीबान (Taliban) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अफगानिस्तान (Afghanistan ) लष्करातील 18 सौनिक ठार झाले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वृत्तसंस्था सिन्हुआचा हवाला देत आएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, तालिबानी दहशतवाद्यांनी एक जिल्हा पोलीस स्टेशन आणि ख्वाजा घर जिल्ह्यातील एका लष्करी तळावर हल्ला केला.
पर्वतीय प्रदेशातून आलेल्या दहशतवाद्यांनी जिल्हा पोलीस ठाण्याचे मोठे नुकसान केले तसेच जिल्ह्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलातील जवानांनी दहशतवाद्यांचे प्रयत्न उधळून लावले. (हेही वाचा, Coronavirus: चीनमध्ये Xi Jinping यांच्या सत्तास्थानाला कोरोना व्हायरस संकटामुळे धक्का? )
एका अधिकाऱ्याने सांगितले की घटनास्थळावर झालेला रक्तपात पाहता दहशदवाद्यांनाही मोठे नुकसान पोहोचले आहे. दरम्यान, या हल्ल्यासंदर्भात दहशतवादी संघटना तालिबानने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिला नाही.