Close
Advertisement
 
शुक्रवार, फेब्रुवारी 28, 2025
ताज्या बातम्या
43 minutes ago

Virar Video: अरे देवा! सिगारेट देण्यास नकार दिल्याने पेट्रोलपंपवर थेट कार पेटवली, तरुणाची पराक्रम कॅमेरात कैद

व्हायरल Pooja Chavan | Feb 19, 2024 10:23 AM IST
A+
A-

Virar Video: रोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यापैकी काही माहितीदायक असतात तर काही भयावह असतात. अवघ्या काही छोट्याछोट्या गोष्टीवरून मारामारीचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात.दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका तरुणीने पेट्रोलपंपवर क्षुल्लक  कारणावरून कार पेटवली आहे. या भयावह कृत्याचा व्हिडिओ पेट्रोलपंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील संतापले आहे. (हेही वाचा- भटक्या कुत्र्याला बाईकने बांधून रस्त्यावर फरफटत नेलं)

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दिसल्याप्रमाणे एक जोडपं पेट्रोलपंपवर कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी येतात दरम्यान  तरुणीने तिच्या प्रियकराकडून सिगारेट मागितली होती परंतु त्याने सिगारेट देण्यास नकार दिला. याचाच रागात मनात भरात तरुणीने पेट्रोलपंपवर कारला लाईटरने आग पेटवली. संपुर्ण कारला क्षणातच आग लागते. आग लागताच दोघे जण घटनास्थळावरून पळून जातात.

हा व्हिडिओ X वर  @PicturesFoIder नावाच्या अकाऊंट वरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून अनेक युजर्संनी संताप व्यक्त केला आहे. आता पर्यंत हा व्हिडिओ १२ दशलक्ष लोकानी पाहिला आहे. अनेक युजर्सनीं कंमेट करत महिलेला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देखील केली आहे.

RELATED VIDEOS